Kalyan Neighbour Dispute Saam
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: मराठी माणूस भिकारी, भैय्यांनी हिणवलं ; कल्याण प्रकरणात नेमकं काय घडलं?

Kalyan Neighbour Dispute: निलंबित अकाऊंट मॅनेजर अखिलेश शुक्ला सोसायटीतला रहिवासी असून, धूप लावण्यावरून शुक्लाची पत्नी आणि शेजारी वर्षा काळविकटे यांच्यात वाद झाला आणि वादाचं रूपांतर हाणामारीत झालं.

Bhagyashree Kamble

भरत मोहळकर, साम टीव्ही

कल्याणमध्ये परप्रांतीय सरकारी कर्मचाऱ्यानं मराठी कटुंबाला केलेल्या मारहाण प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाई केलीय. अखिलेश शुक्ला नावाच्या पर्यटन खात्यातल्या या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं असून त्याला अटक करण्यात आलीय. तसंच मराठी माणसांवर दादागिरी करणाऱ्या माजोरड्यांचा माज उतरवणार असल्याचा इशाराही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलाय.

कल्याणमधील हायप्रोफाईल सोसायटीत अखिलेश शुक्ला या मुजोर परप्रांतिय अधिकाऱ्याने गुंडांमार्फत मराठी कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीय. एवढंच नाही तर शुक्ला नावाच्या या अधिकाऱ्याने मराठी माणसाबद्दल हिणकस भाषा वापरल्याचा आरोप सोसायटीतील रहिवाशांनी केलाय. तर शुक्ला कमरेची बंदूक काढून जीवे मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जखमी देशमुखांनी केलाय. तर अखिलेश शुक्लाने देशमुख आणि काळविकटे कुटुंबावरच आरोप केलेत.

कल्याणमध्ये नेमकं काय घडलं?

कल्याणमधील योगाधाम परिसरातील अजमेरा ही उच्चभ्रू सोसायटी आहे. या सोसायटीत मराठी-अमराठी लोकांचं वास्तव्य आहे. पर्यटन खात्यातील अकाऊंट मॅनेजर अखिलेश शुक्ला सोसायटीतला रहिवासी असून, धूप लावण्यावरून शुक्लाची पत्नी आणि शेजारी वर्षा काळविकटे यांच्यात वाद झाला.

अखिलेश शुक्लाच्या १०-१५ भाडोत्री गुंडांनी काळविकटे आणि देशमुख कुटुंबावर हल्ला चढवला होता. या हल्ल्यात ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणाचे पडसाद अधिवेशनातही उमटले. मुख्यमंत्र्यांनी माजोरड्या शुक्लाच्या निलंबनाची तर घोषणा केलीय. मात्र माजोरड्यांचा माज उतरवण्याचा इशाराही त्यांनी विधानपरिषदेत दिलाय.

याआधीही गिरगाव, घाटकोपर, भांडूप स्टेशनसह अनेक ठिकाणी मराठी माणसांवर अन्याय होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे मराठी माणसांचा सन्मान राखण्यासाठी आणि परप्रांतियांची मुजोरी मोडून काढण्यासाठी सरकारने कठोर कायदे करायला हवेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT