kalyan  Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime : कल्याणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला भयंकर मारहाण, दगड पायावर मारून केलं गंभीर जखमी; घटना कॅमेऱ्यात कैद,VIDEO

Kalyan Latest News : कल्याणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला भयंकर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दगड पायावर मारून पदाधिकाऱ्याला गंभीर जखमी केलं आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

Kalyan : कल्याणमधून राजकीय वर्तुळातून खळबळजनक घटना समोर आली आहे. कल्याणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्याण पश्चिमच्या पारनाका परिसरात ही घटना घडली आहे. हेमंत परांजपे असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.

कल्याणच्या पश्चिम येथील पारनाका येथे भाजप पदाधिकारी हेमंत परांजपे यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. शनिवारी रात्रीच्या सुमारास पारनाका परिसरात ही घटना घडली आहे. हल्लेखोर दुचाकीवरून आले. त्यानंतर त्यांनी थेट मारहाण करायला सुरुवात केली. या अज्ञातांनी हेमंत यांच्या पायावर दगड मारून त्यांना गंभीर जखमी केलं. या हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

कल्याणमधील घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर हेमंत परांजपे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, बाजारपेठ पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. परिसरात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका परप्रांतीय अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीने मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना घडली होती. या शुक्लाने केलेल्या माराहणीत देशमुख कुटुंबीय गंभीर जखमी झाले होते. या गंभीर प्रकाराचे सर्वत्र पडसाद उमटले होते. या मारहाणीच्या घटनेनंतर पोलिसांनी शुक्लासहित त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. सककारी कर्मचारी असलेल्या अखिलेश शुक्लाला निलंबित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

देशमुख कुटुंबाला मारहाण झाल्याचा विषय विरोधकांनी विधानसभेत लावून धरला होता. त्यानंतर विरोधकांच्या प्रश्नाने सत्ताधारी कोंडीत सापडल्याचे दिसून आलं होतं. मात्र, या संपूर्ण प्रकारानंतर कारवाई केल्याची माहिती सत्ताधारी मंत्र्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT