Kalyan Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: बायको सोडून गेल्यानं माथेफिरूने बस अडवून चालकावर कोयत्याने केला हल्ला; कल्याणमधील धक्कादायक घटना...

Kalyan Latest News: बायको सोडून गेल्यानं माथेफिरूने बस अडवून चालकावर कोयत्याने केला हल्ला; कल्याणमधील

Satish Kengar

>> अभिजित देशमुख

Kalyan Crime News: भर रस्त्यात एका माथेफिरूने बस अडवून बस चालकावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बस चालकाने प्रतिकार केल्याने या माथेफिरूने कोयत्याने बसची तोड फोड केली. इतकेच नव्हे आणखी दोन बसची तोड फोड केली. कल्याण रामबाग परिसरात सायंकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मोठ्या धाडसाने बस चालक व कंडक्टरने या माथेफिरूला पकडून महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात दिलं. बाळू साबळे, असे या माथेफिरूचे नाव असून काही वर्षांपूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून गेली. त्यानंतर तो मानसिक तणावात होता. याच मानसिक तणावातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिम राम बाग परिसरात एका माथेफिरूने हातात कोयता घेत चांगलाच धिंगाणा घातला. केडीएमटीची बस अडवून बस चालकावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. (Latest Marathi News)

चालकाने प्रतिकार केल्याने या माथेफिरूने बसवर कोयत्याने प्रहार करत बसेसच्या काचा फोडल्या. यानंतर पाठीमागून येणाऱ्या दोन बसेसच्या काचा फोडल्या. अचानक घडलेल्या या घटनेमूळे परिसरात एकच खळबळ उडाली. बस चालक व कंडक्टरने मोठ्या धाडसाने या माथेफिरूला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.

घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या माथेफिरूला ताब्यात घेतलं. महात्मा फुले पोलिसांनी बाळू साबळे याला ताब्यात घेत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT