Kalyan News प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

Kalyan: मनसेच्या पदाधिकाऱ्यावर शिंदे गटातील विभागप्रमुखाच्या भावाकडून चाकू हल्ला

कल्याण जवळील मोहने परिसरात कार मधून जात असलेल्या एका मनसे (MNS) पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

प्रदीप भणगे

कल्याण: कल्याण (Kalyan) जवळील मोहने परिसरात कार मधून जात असलेल्या एका मनसे (MNS) पदाधिकाऱ्याला त्याच्या मागून दुचाकीवर आलेल्या ४ जणांनी त्यांची गाडी आडवून आमच्या गाडीला ओव्हरटेक का केले अशी विचारणा करत चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

अमित कोट असं मारहाण झालेल्या मनसे पदाधिकाऱ्याचं नाव आहे. तर मारहाण केलेला व्यक्ती हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचा विभाग प्रमुख अंकुश जोगदंड यांचा लहान भाऊ असून तो मोहने येथील रिक्षा संघटनेचा अध्यक्ष असल्याचं समजत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमित कोट हा तरुण आपल्या मित्रांसोबत कारमधून निघाला असता मागून चार जणांनी त्याचा पाठलाग केला. आम्हाला ओव्हरटेक का केलं असं म्हणत त्यांनी अमित अनंत कोट वय वर्ष २९ या मनसेचे विद्यार्थी सेनेच्या विभाग अध्यक्षला मारहाण केली. तर अमित कोट याने अश्विन जोगदंड वय वर्ष ३५, संदीप डोलारे वय वर्ष ३४ आणि दोन अनोळखी इसम यांच्याविरुध्द तक्रार दिली आहे.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान मोहने येथील नागरिकांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, अमित कोट हे मनसेचे विद्यार्थी सेनेचे विभागीय अध्यक्ष आहेत. आरोपी अश्विन जोगदंड हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा विभाग प्रमुख अंकुश जोगदंड यांचा लहान भाऊ आहे आणि तो मोहने येथील रिक्षा संघटनेचा अध्यक्ष आहे.

मनसेचे विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष अमित कोट हा आपले मित्र गोरख येवले यांच्या सोबत बिर्ला महाविद्यालय येथे गोरख यांच्या मुलीला अकरावी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी चालला होता. दरम्यान मोहने बंदर भागातून जात असताना अचानक चार जण अमित यांच्या मोटारीला आडवे आले आणि त्यांनी मोटार थांबवून अमित यांच्याशी वाद घातला.

अमित मोटारीतून बाहेर आल्यावर चारही जणांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली.  आरोपी अश्विन जोगदंड याने अमित यांच्या छातीवर चाकूने हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले. तू मला जेथे भेटशील तेथे तु मी तुला ठार मारीन अशी धमकी जोगदंडने अमितला दिली.

मारहाणीनंतर जोगदंड सह तीन आरोपी पळून गेले. पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी (Khadakpada Police) आश्विन जोगदंड,संदीप डोलारे आणि दोन अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT