Kalyan Crime News Saam Digital
मुंबई/पुणे

Kalyan Crime News : सावधान!अनधिकृत चाळींची सोशल मीडियावर जाहिरात, कल्याणमध्ये भूमाफीयांचा प्रताप

Kalyan Crime : कल्याण जवळील बनेली परिसरात चाळींचे अनाधिकृत बांधकाम करून रुम विक्री करण्याबाबतची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर वायरल करण्यात आली होती. केडीएमसीने याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे.

Sandeep Gawade

अभिजित देशमुख, कल्याण

कल्याण जवळील बनेली ,मांडा, उंभरणी टिटवाळा भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळींचे बांधकाम सुरू आहे. या अनधिकृत बांधकामामुळे या परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झालं आहे. तर दुसरीकडे भूमाफियांकडून स्वस्त घरांच्या नावाखाली ही अनधिकृत घरे गरजू नागरिकांच्या माथी मारत त्यांची फसवणूक सुरू आहेत . बनेली परिसरात असाच एक प्रकार समोर आला आहे.

एका भूमाफीयाने आपल्या चाळींच्या बांधकामाची जाहिरात करत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला होता. या व्हिडिओची केडीएमसीने दखल घेत प्रत्यक्ष जागेची पाहणी केली आणि भूमाफियावर कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . अब्दुल अतिक फारुकी असं या भूमाफियाचं नावं असून त्या चाळींचं देखील बांधकाम तत्काळ जमीनदोस्त करणार असल्याची माहिती केडीएमसीचे उपायुक्त अवधूत तावडे यांनी दिली.

कल्याण जवळील बनेली परिसरात चाळींचे अनाधिकृत बांधकाम करून रुम विक्री करण्याबाबतची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर वायरल झाली होती. या क्लिपची कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाने तत्काळ दखल घेतली. अनाधिकृत बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांच्या पथकाने उंभर्णी बनेली परिसरात संबंधित बांधकामाची पाहणी केली. या ठिकाणी केएफइंटरप्राइजेसतर्फे अब्दुल अतिक फारुकी हे चाळींचं अनधिकृत बांधकाम करून रुम गरजू नागरिकांना विक्री करत असल्याचं निदर्शनास आलं.

याप्रकरणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त अवधूत तावडे यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सहाय्यक आयुक्तांनी अब्दुल अतिक फारुकी विरोधात टिटवाळा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रादेशिक नगरनियोजन अधिनियम १९६६ मधील कलम ५२ आणि ५३ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफीयाविरोधात यापुढे देखील सातत्याने अशी कारवाई सुरू राहणार असल्याचं तावडे यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT