Doctor assaulted inside hospital cabin in Kalyan Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime: केबिनमध्ये घुसून डॉक्टरला बेदम मारहाण, आधी कॉलर पकडली नंतर लाथाबुक्क्या मारल्या; कल्याण हादरले

Doctor assaulted inside hospital cabin in Kalyan: कल्याण पूर्वेतील एका नामांकित रुग्णालयात डॉक्टरला बेदम मारहाण करण्यात आली. रुग्णाच्या नातेवाईकाने हे भयंकर कृत्य केले.

Priya More
  • कल्याणमध्ये डॉक्टरला बेदम मारहाण करण्यात आली

  • कल्याण पूर्वेतील भानु ज्योत हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली

  • डॉक्टरला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली

  • कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच आता कल्याणमध्ये देखील अशीच घटना घडली. कल्याणमध्ये डॉक्टरला मारहाण करण्यात आल्याने खळबळ उडाली. पूर्वेतील नामांकित भानु ज्योत हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. रुग्णाच्या नातेवाईकाने केबिनमध्ये घुसून डॉक्टरला मारहाण केली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका रुग्णासोबत आलेला त्याच्या मुलाने डॉक्टरला मारहाण केली. विनीत देशमुख डॉक्टरांच्या केबिनमध्ये आला होता. डॉक्टर योगेंद्र जयस्वाल हे रुग्णाला त्याच्या आजाराबाबत समजावून सांगत असताना रुग्णाच्या मुलगा विनीत देशमुख संतापला. त्यानंतर रुग्णाने स्वत: आपल्या मुलाला केबिनच्या बाहेर जाण्यास सांगितले. वडिलांनी सांगितले तसं त्या मुलाने सुरूवातीला ऐकले. पण नंतर तो परत डॉक्टरच्या केबिनमध्ये आला आणि त्याने डॉक्टरला मारहाण केली.

रुग्णाच्या मुलाने केबिनमध्ये घुसून डॉक्टर योगेंद्र जयस्वाल यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे रुग्णालयातील वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला. याप्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे रुग्णालयात गोंधळाचे वातावरण होते.

दरम्यान, डॉक्टरांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे वैद्यकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णांना सेवा द्यायची कशी आणि रुग्णालये सुरक्षितपणे चालवायची कशी, असा प्रश्न डॉक्टरांकडून उपस्थित केला जात आहे. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने या घटनांची गंभीर दखल घेऊन तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेसचे नाशिकमध्ये आजपासून १० दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Peri Peri French Fries Recipe: रेस्टॉरंटस्टाईल कुरकुरीत पेरी-पेरी फ्रेंच फ्राईज बनवा घरच्या घरी;वाचा सोपी रेसिपी

Anti Aging Tips : स्किनकेअर नाही, महागडे ट्रीटमेंटही नाही! 44 व्या वर्षी तरुण दिसण्यासाठी 8 सोप्या टिप्स

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची मोठी भेट, ४८ तासांत खात्यात जमा होणार ३००० रुपये? मोठी अपडेट समोर

Nashik Fort : कळसूबाई पर्वतरांगांचं सुंदर दृश्य पाहायचंय? मग नाशिकच्या मातीत लपलेल्या 'या' किल्ल्यावर नक्की जा

SCROLL FOR NEXT