Kalyan Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: लहान मुलांची भांडणे सोडवणं पडलं महागात, सोसायटीच्या चेअरमनवर धारदार शस्त्राने हल्ला; CCTV व्हिडीओ आला समोर

Kalyan News: लहान मुलांची भांडणे सोडवणं पडलं महागात, सोसायटीच्या चेअरमनवर धारदार शस्त्राने हल्ला; CCTV व्हिडीओ आला समोर

Satish Kengar

>> अभिजित देशमुख

Kalyan Crime News:

लहान मुलांचे भांडण सोडवणे सोसायटीच्या चेअरमनला महागात पडलं आहे. भांडण सोडवल्याच्या रागातून लहान मुलाच्या चुलत्याने आपला मित्रांसोबत सोसायटीच्या चेअरमनवर धारदार शस्त्राने हल्ला करण्याच्या प्रयत्न केला आहे.

डोंबिवलीतील लोढा हेवन या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेत लोढा हेवन कॉम्प्लेक्स मध्ये ओम प्राईस ही सोसायटी आहे. काही दिवसापूर्वी या सोसायटीत राहणारे सिंग कुटुंबातील एका मुलाचे दुसरा एका मुलासोबत भांडण झाले होते. हे भांडण सोसायटीचे चेअरमन सागर जोशी यांनी सोडवले होते. (Latest Marathi News)

लहान मुलाच्या नातेवाईकांना याचा राग आला. याचा राग मनात ठेवून लहान मुलाचा चुलता रविवारी सकाळी आपल्या एका मित्रासोबत ओम प्राईस सोसायटीत आला आणि दोघांनी सोसायटीत येऊन गोंधळ घालायला सुरुवात केली. आकाश सिंग, असे या त्याचे नाव सांगितले जात आहे. आकाश हा आपल्या एका मित्रासोबत सोसायटीत आला. त्यांच्या हातात धारदार शस्त्र होते. सागर जोशी यांचा आरोप आहे की, सर्वात आधी या लोकांनी सोसायटीच्या सुरक्षारक्षकांसोबत हुज्जत घालत त्याला धक्काबुक्की केली. त्यानंतर एका व्यक्तीला धक्काबुक्की केली.

नंतर जेव्हा सागर जोशी हे घरातून खाली आले. त्यांच्यावर हल्ला केल्याच्या प्रयत्न केला, मी मराठी असल्याने जाणीवपूर्वक मला या ठिकाणी त्रास दिला जात असल्याचे आरोप सागर जोशी यांनी केला आहे. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद असल्याने सीसीटीव्ही फुटेज मानपाडा पोलिसांना देण्यात आले आहे. या प्रकरणात मानपाडा पोलीस ठाण्यात सागर जोशी यांनी तक्रार दिली आहे. मात्र एका हाय प्रोफाईल सोसायटीत सोसायटीच्या चेअरमनला या प्रकारची वागणूक दिली जात असल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मानपाडा पोलीस या प्रकरणाच्या तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT