File Photos Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: रात्री रस्त्यात एकट्याला गाठून करायचे शस्त्राने हल्ला; पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळत संपविली दहशत

हल्ला करून नागरिकांना लुटणाऱ्या या तिघांना कल्याण क्राईम ब्रँचने बेड्या ठोकल्या आहेत

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख

Kalyan Crime News: रात्री अपरात्री रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांवर चाकू लाठ्या काठ्यानी हल्ला करणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हल्ला करून नागरिकांना लुटणाऱ्या या तिघांना कल्याण क्राईम ब्रांचने बेड्या ठोकल्या आहेत. (Latest Marathi News)

पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. नाबिर शेख ,प्रेमकुमार गोस्वामी,सूरज विश्वकर्मा अशी तीन लुटारूंची नावे आहेत. या तिघांविरोधात कोळशेवाडी ,मानपाडा, खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे .त्यांच्याकडून तीन मोटरसायकल ,पाच मोबाईल फोन असा सुमारे पावणे दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

कल्याण पूर्व मलंग रोडवर एका बार मॅनेजरवर शस्त्राने हल्ला करत त्याच्याजवळ रोकड लुटल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती . त्यापाठोपाठ डोंबिवली पूर्व टाटा पावर परिसरात रात्रीच्या सुमारास एका नागरिकांवर चाकूने हल्ला करत मोबाईल व पैशांचे पाकीट लुटल्याची घटना घडली होती.

लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे कोळशेवाडी पोलीस ठाणे मानपाडा पोलीस ठाणे सह कल्याण क्राईम ब्रांचं या गुन्ह्यांचा समांतर तपास करत होते. तपासादरम्यान परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या तीन लुटारूंची ओळख पटवली.

तिन्ही आरोपी कल्याणजवळ असलेल्या आंबिवली मोहने येथील एनर्जी कॉलनी परिसरात असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रँच मिळाली. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रँच पथकाने या परिसरात सापडत या तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. या तिघांविरोधातील डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे, कोळशेवाडी पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे व खडकपाडा पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आणण्यात कल्याण क्राईम ब्रँचला यश आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT