kalyan News  Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Clash : कल्याणमध्ये पुन्हा मोठा राडा; व्यापारी आणि फेरीवाल्याचा भर रस्त्यात तमाशा, नेमकं काय घडलं?

Kalyan Clash update : कल्याणात विक्रेता आणि व्यापाऱ्यांमध्ये राडा झाला. यानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. तर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

Kalyan News : कल्याणमध्ये रिक्षावाल्यांमधील मारहाणीची घटना ताजी असताना आणखी एक गोंधळ उघडकीस आला आहे. कल्याण स्टेशन परिसरात आंबे विक्रेते व्यापारी आणि फेरीवाल्यामध्ये गोंधळ उडाला. त्यानंतर व्यापाऱ्याने फेरीवाल्यांना मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण स्टेशन परिसरात आंबे विक्रेत्या व्यापारी आणि फेरीवाल्यांमध्ये गोंधळ उडाला. फेरीवाल्यांनी आंबेविक्रेत्याचा माल घेऊन पैसे न देत शिवीगाळ केल्याने राडा झाला. भर रस्त्यात शिवीगाळ आणि मारहाण करत वीस ते पंचवीस मिनिटांपर्यंत रस्त्यावर तमाशा केला.

व्यापारी आणि फेरीवाल्याच्या या तमाशामुळे स्टेशन परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. स्थानिक दुकानदार आणि नागरिकांनी हस्तक्षेप करून गोंधळ शांत केला. या प्रकरणी अद्याप पोलिसांत कोणतीही तक्रार केल्याची माहिती हाती आलेली नाही. मात्र, या मारहाणीच्या घटनेमुळे कल्याण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

हिंगोलीत १० ते १२ जणांकडून हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण

हिंगोलीत 25 हजार रुपयांचे खंडणी का देत नाही म्हणत बार अँड रेस्टॉरंटमध्ये दहा ते बारा जणांनी राडा केला. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापकाला प्रचंड मारहाण केली आहे. हिंगोलीच्या नरसी पोलीस स्टेशन हद्दीतील पुसेगाव फाटा येथील निखिल बार अँड रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेत हॉटेल व्यवस्थापक श्रीकांत देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

या आरोपींनी खुर्च्या लाथा बुक्क्या आणि लोखंडी रॉडने त्यांना जबर मारहाण केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी हॉटेल मालक मंगललाल जयस्वाल यांना देखील खंडणी न दिल्यास जीवे मारून टाकू अशी धमकी दिली आहे. तब्बल अर्धा तास आरोपींनी हॉटेलमध्ये सामानाची तोडफोड करत ही मारहाण केली आहे. या आरोपींचा धुडगूस आणि मारहाण करतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नरसी पोलिसांनी आता मारहाण करणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत त्यांच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT