Kalyan building Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan : सप्तश्रृंगी इमारतीचा स्लॅब कोसळला; ढिगाऱ्याखाली दबून चौघांनी जीव गमावला, परिसरात हळहळ

Kalyan building slab collapse : सप्तश्रृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे. चिकणीपाडा परिसरात ही घटना घडली.

Vishal Gangurde

कल्याण : कल्याणच्या चिकणीपाडा परिसरातील सप्तश्रृंगी इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. कल्याण पूर्व मंगलराघो नगर चिकणीपाडा परिसरात ही धक्कादायक घटना घडली. इमारतीचा स्लॅब कोसळल्यानंतर काही नागरिक अडकले. या दुर्देवी घटनेत चौघांनी जीव गमावला. तीन महिला आणि एका चिमुकलीचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. या घटनेने कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे.

कल्याणमधील चिकणीपाडा परिसरातील चार मजली सप्तशृंगी इमारतीचा दुसऱ्या माळ्याचा स्लॅब कोसळला. दुसऱ्या माळ्याचा स्लॅब थेट पत्त्यासारखा तळमजल्यापर्यंत कोसळला. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले. यातील चौघांचा मृत्यू झाला. तीन महिलांसह एका दीड वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.

इमारतीचा स्लॅब कोसळल्यानंतर अग्निशमन दल, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांकडून मदत कार्य सुरू करण्यात आली. इमारतीचा स्लॅब कोसळल्यानंतर जखमींना इमारतीतून बाहेर काढले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे.

कल्याण पूर्व महाराष्ट्र नगर चिकणीपाडा भागात सप्तश्रृंगी इमारत आहे. ही इमारत ४० वर्ष जुनी आहे. या इमारतीत एकूण २५ कुटुंब राहत होते. इमारतीच्या एका बाजूचा दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत अनेक जण अडकले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या जवानांनी धाव घेतली. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरु केले. या घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे पुन्हा एकदा धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT