Kalyan Motorcycle Thief Arrested Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan : कल्याणमध्ये दुचाकी चोरीचा पर्दाफाश, सराईत चोर अटकेत; १.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Kalyan Motorcycle Thief Arrested: कल्याणमध्ये मोटारसायकल चोरीच्या मालिकेचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून आग्रा येथील २७ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • कल्याणमध्ये दुचाकी चोरी करणारा सराईत आरोपी पोलिसांच्या ताब्यात

  • आरोपीकडून १.९५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

  • कल्याण बाजारपेठ पोलिसांनी कारवाई केली

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

गेल्या काही दिवसांमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. अशातच बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठी कारवाई करत मोटारसायकल चोरीच्या मालिकेचा पर्दाफाश केला. याप्रकरणी एका सराईत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या चरोट्याने आग्रा येथून डुप्लिकेट चावी आणून कल्याण शहरात दुचाकी चोरी केल्या. पोलिसांनी आरोपीकडून चार मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून सुमारे १ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

कल्याण बाजारपेठ पोलिसांना मोटर सायकल चोरी करणारा आरोपी कल्याणमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार, त्यांनी कल्याण पश्चिमेकडील बोंबिल गल्ली परिसरात सापळा रचून पोलिसांनी शाहरूख जाकीर हुसेन वय २७ वर्ष याला अटक केली. तो मूळचा आग्रा येथील असून सध्या कल्याणमध्ये फिरस्ता म्हणून राहत होता.

दिनांक २ मार्च २०२६ रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार आरोपी चोरीस गेलेली मोटारसायकल घेऊन उभा असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपीने गेल्या ५ ते ६ महिन्यांत कल्याण शहरातील विविध ठिकाणांहून वेगवेगळ्या कंपनीच्या दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एकूण ४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून चार गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश आले आहे.

सदर गुन्हे महाराष्ट्र पोलीस अंतर्गत बीएनएस कलम ३०३(२) प्रमाणे नोंदविण्यात आले आहेत. आरोपीस अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे.अशी माहिती कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अस्सल गावरान स्टाईल चिवळीची भाजी कधी खाल्लीये का? एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा| Chivalichi Bhaji Recipe

Pune : पुणेकरांना मोठा दिलासा! पाण्याची चिंता मिटली, ८ दिवसांत धरणातील पाणीसाठा वाढला; वाचा ताजी आकडेवारी

Thick Curd: पावसाळ्यात घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं?

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT