Kalyan-Badlapur Rain News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan-Badlapur Rain News: कल्याण-बदलापूर रोडवर साचलं पाणी, वाहतूक संथ गतीने सुरू

Kalyan-Badlapur Road News: कल्याण-बदलापूर रोडवर साचलं पाणी, वाहतूक संथ गतीने सुरू

अजय दुधाने

Kalyan-Badlapur Rain News: आज संध्याकाळच्या सुमारास पावसाने जोर धरल्याने कल्याण बदलापूर रोडवरती प्रचंड पाणी साठले असून, अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर रोड वरती वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या रोडला कल्याण बदलापूर रोड असंही म्हणतात.

कल्याणकडे येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात संध्याकाळच्या सुमारास होत असते. हा रोड एका बाजूने बंद करण्यात आला असून एकाच मार्गाने वाहतूक सुरू आहे.

यातच कल्याणमध्ये पावसाचा जोर वाढल्याने मुसळधार पावसाचा फटका लोकल सेवेलाही बसला आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे लोकल वाहतूक पंधरा ते वीस मिनिटे उशिराने सुरू आहे. (Latest Marathi News)

भिवंडीत पावसाचं थैमान, पूरसदृश्य परिस्थिती, रस्त्यांवर पाणी

भिवंडीत पावसाचा जोर वाढला. शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. बाजार पेठ, शिवाजी चौक, नझराना कंपाउंड या परिसरात 4 ते 5 फूट पाणी साचले आहे. शेकडो दुकानांमध्ये पाणी घुसल्याने नुकसान झाले आहे.

दरम्यान, पावसामुळे कल्याण पश्चिमेकडे छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसरात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालकांना, नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागतेय. पावसाचा जोर कायम राहिल्यास शहरातील इतर सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mamata Banerjee : ममता बॅनर्जींचा आणखी एक तगडा झटका; नीकटवर्तीय नेत्यानं दिला महापौरपदाचा राजीनामा

Shukra Gochar: सावधान! पाच राशींसाठी पुढील दिवस धोक्याचे; शुक्राच्या गोचरमुळे आयुष्यात येतील अडचणी

Maharashtra News Live Update: राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणांचे प्रयत्न? मुख्यमंत्री भेटीमुळे चर्चांना उधाण

Mangalsutra Paan Design: वटपोर्णिमेसाठी ट्राय करा पानाचे सुंदर मंगळसूत्र, पाहा या ७ ट्रेंडी डिझाइन्स

Crime: अमरावती हादरले! बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला, भरचौकात धारदार शस्त्राने वार करत तरुणाला जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT