CCTV Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: कल्याणमध्ये चाललंय काय? शहरात पुन्हा मराठी कुटुंबाला मारहाण; घरातील अल्पवयीन मुलीशी गैरवर्तवणूक

Kalyan News: कल्याणमध्ये पुन्हा एकदा परप्रांतीय व्यक्तीकडून मराठी कुटुंबाला मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.

Saam Tv

Kalyan: गेल्या काही दिवसांपासून कल्याण शहर चर्चेचे केंद्र बनले आहे. कल्याणमध्ये राहणाऱ्या देशमुख कुटुंबाला त्यांच्या शेजारी राहणाऱ्या अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीने मारहाण केली. देशमुख कुटुंब मारहाण प्रकरण ताजे असताना आता पुन्हा कल्याणमधूनच परप्रांतीयांनी केलेल्या दादागिरीची माहिती मिळाली आहे.

कल्याणच्या अदिवली परिसरातील रागाई कॉम्प्लेक्स येथे राहणाऱ्या मराठी तरुणाला तेथेच राहणाऱ्या परप्रांतीय शेजाऱ्याने त्रास दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबामध्ये वाद सुरु झाला. साधारणपणे मुलांच्या खेळण्यावरुन भांडणाला सुरुवात झाली. त्या मराठी तरुणाच्या नऊ वर्षांच्या मुलीशी परप्रांतीय शेजाऱ्याने गैरवर्तवणूक केली. याबाबत जाब विचारायला गेल्यावर त्याने मराठी तरुणाला आणि त्याच्या पत्नीला, आईला जबर मारहाण केली.

बाचाबाची, भांडण यावरुन पुढे प्रकरण हे मारहाणीपर्यंत गेले. मारहाणीमध्ये मराठी तरुण जखमी झाला आहे. तसेच त्याच्या पत्नीला आणि आईलादेखील दुखापत झाली आहे. मारहाण करणाऱ्या परप्रांतीय माणसाचे नाव उत्तम पांडे असे आहे. मारहाण प्रकरणामध्ये उत्तम पांडे व्यतिरिक्त त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी संबंधित प्रकरणाची माहिती दिली. "मुलांच्या खेळण्यावरुन भांडणाला सुरुवात झाली. त्यावर प्रकरण वाढत गेले. शेजारी राहणाऱ्या उत्तम पांडे या परप्रांतीय इसमाने आपल्या अल्पवयीन नऊ वर्षीय मुलीचा विनयभंग केला अशी मराठी तरुणाने आणि तिच्या कुटुंबाने तक्रार केली आहे. पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली असून पांडे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे." अशी माहिती राम चोपडे यांनी दिली आहे. घटलेला मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

कल्याणमध्ये सलग दुसऱ्यांदा मराठी माणसाची परप्रांतीयांद्वारे मारहाण केल्याचे मोठे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणांवरुन स्थानिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT