Kalyan Accident  Saam Tv
मुंबई/पुणे

Accident: कल्याणमधील रिंग रोडवर अपघाताचा थरार, भरधाव कारने सायकलस्वाराला चिरडलं; थरकाप उडवणारा VIDEO

Kalyan Accident: कल्याणच्या रिंगरोडवर भयंकर अपघात झाला. भरधाव कारने सायकलस्वाराला धडक दिली. या अपघातामध्ये सायकलस्वाराचा मृत्यू झाला. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

Summary -

  • कल्याण रिंग रोडवर भीषण अपघात

  • सायकलस्वार कारने उडवलं ठार

  • अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू

  • अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याणमध्ये भरधाव कारने सायकस्वाराला चिरडलं. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. कल्याणमधील गांधारी परिसरातील रिंग रोडवर हा अपघात झाला आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारचालाकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.

कल्याणमधील रिंग रोड अपघातांचा हॉटस्पॉट बनत चालला आहे. या रिंग रोडवर आणखी एक भीषण अपघात झाला. कारने सायकलला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की सायकलस्वार फुटबॉलसारखा उडून दूरवर फेकला गेला. अपघातामध्ये सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. श्रीनिवास तांदळे असं मृत व्यक्तीचे नाव होते.

श्रीनिवास तांदळे सायकलवरून जात असताना अचानक मागून आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या श्रीनिवास यांचा जास्त रक्तस्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. मात्र गंभीर दुखापतीमुळे श्रीनिवास तांदळे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार कारचालकाचा शोध पोलिस घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, गांधारी रिंग रोडवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्याने आणि वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांमुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने या मार्गावर तातडीने कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suraj Chavan : गुलाबी गाऊन अन् मोकळे केस; सूरज चव्हाणच्या बायकोचे मॅटर्निटी फोटोशूट पाहिलंत का? VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: भीमाशंकर मार्ग बंद; माळीण परिसरात दरड कोसळली

IND vs ENG: टीम इंडिया 76 रन्सवर गारद! इंग्लंडविरूद्धच्या लाजीरवाण्या पराभवासाठी हे 5 खेळाडू जबाबदार

Rain Alert: राज्यात आजही अतिवृष्टी, वादळी-वाऱ्यासह पावसाचा अंदाज; पुढचे २४ तास महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, नेरळ- भिवपुरीदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी, बदलापूर ते कर्जत वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT