Amol Kolhe on Shivneri Hapus Saam Tv
मुंबई/पुणे

Shivneri Hapus: जुन्नर हापूसला लवकरच 'शिवनेरी हापूस' ओळख मिळणार, अमोल कोल्हे यांचं वक्तव्य

जुन्नर हापूसला लवकरच 'शिवनेरी हापूस' ओळख मिळणार, अमोल कोल्हे यांचं वक्तव्य

साम टिव्ही ब्युरो

>> रोहिदास गडदे

Amol Kolhe on Shivneri Hapus: जुन्नर हापूस नवी ओळखीच्या मानकांसाठीचा लढा अनेक दिवसांपासून सुरु होता. अखेर जुन्नर हापूसला लवकर मानांकन मिळणार असल्याचा विश्वास खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलाय.

पुरातन काळात मुगल साम्राज्यातील राजवटीत लागवड करण्यात आलेल्या हापूसला नवी ओळख मिळावी यासाठी संघर्ष सुरु होता. कोकण आणि कर्नाटक हापूसच्या तुलनेत जुन्नरचा हापूसआकार, वजन आणि चवीने वेगळा असल्याचे तपासणीतून पुढे आलं आहे.

यानंतर जुन्नर हापसूल "शिवनेरी हापसू" असे मानांकन मिळावे यासाठी संघर्ष सुरु आहे. आता अखेर ही प्रतिक्षा लवकरच संपणार असल्याने जुन्नरच्या वैभवात नवी ओळख निर्माण होणार असल्याचा विश्वास खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. (Latest Marathi News)

मविआ सरकारमध्ये मानांकन करण्याचे अजित पवार यांनी दिले होते निर्देश

महाविकास आघाडीचे सरकार असताना २०२० मध्ये अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना जुन्नर व आंबेगाव या भागातील हापूस आंब्याला शिवनेरी हापूस म्हणून मानांकन करून द्या, असे निर्देश दिले होते. त्यावेळी त्यानी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना पुणे येथे झालेल्या आढावा बैठकीत हे निर्देश दिले होते. यानंतरही मानांकनसाठी अद्यापही स्थानिकांना संघर्ष करावा लागत आहे.

अजित पवार यांनी काय दिले होते निर्देश?

याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश देताना अजित पवार म्हणाले होते की, ''देवगड, रत्नागिरीकडील आंबा उत्पादक घाटावरच्या आंब्याला हापूस मानत नाहीत. मात्र घाटावरचा आंबा सुध्दा देवगड, रत्नागिरीच्या तोडीस तोड आहे. कोकणातील हवामान व घाटावरचे हवामान यामुळे दरवर्षी कोकणातील आंबा संपल्यावर घाटावरचा आंबा सुरू होतो. त्यामुळे तो दुर्लक्षीत राहिला आहे. त्याला बाजार व्यवस्थित मिळत नाही.''

जर या आंब्याला शिवनेरी हापूस म्हणून मानांकन मिळाल्यास बाजारात त्याचे वेगळे स्थान तयार होईल, त्यातून त्याची मागणी वाढेल. आंबा उत्पादक शेतक-यांचा फायदा होईल. आंबा बागा देखिल वाढतील. यासाठी जुन्नर, आंबेगाव मधिल आंब्याला शिवनेरी हापूस म्हणून मानांमन करून द्या, असे निर्देश अजित पवार यांनी विभागिय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bedroom Decoration Ideas For Couple : रोमॅन्टिक कपलसाठी बेडरूम डेकोरशनच्या 5 भन्नाट आयडिया, आनंददायी वाटेल

Navratri 2026 : नवरात्रीत देवीसमोर 'या' दिशेला लावा अखंड दिवा; घरात येईल पैसाच पैसा

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीचा थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

IND vs SL ODI Fact Check: पहिला वनडे सामना दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार? व्हायरल सत्य

Maharashtra News Live Update: ८ आठवड्यांच्या आत सर्व समित्या गठीत करा, हायकोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT