Eknath Shinde- Jogendra Kawade Saam TV
मुंबई/पुणे

Eknath Shinde-Jogendra Kawade: शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र; पीपल्स रिपब्लिकन पार्टी-शिंदे गटाच्या आघाडीचे घोषणा

बाळासाहेबांची शिवसेना आणि पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या आघाडीची घोषणा आज जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यात भीमशक्ती-शिवशक्तीचा नवीन प्रयोग पुन्हा अस्तित्वात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांची संयुक्त पत्रकार परिषद आज मुंबईत पार पडली. बाळासाहेबांची शिवसेना आणि पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या आघाडीची घोषणा आज जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे.

बऱ्याच दिवसांपासून शिंदे यांच्यासोबत युती व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते. सर्वसामान्यांचं सरकार आहे, म्हणून त्यांच्यासोबत जावं अशी लोकांची भावना आहे. राज्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांना आश्वस्त करणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा धडाकेबाजपणा बघून पीपल्स रिपब्लिकन पक्षाने युतीचा निर्णय घेतला, असं जोगेंद्र कवाडे यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

शिव-शाहू-फुले आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विचार हा आमच्या आघाडीचा विचार आहे. यापुढे राज्यातील पाच विभागात आमच्या जाहीर सभा होतील, अशी माहिती देखील जोगेंद्र कवाडे यांनी दिली.

जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत आघाडी केली आहे. सरकार बदलल्यानंतर अनेकांनी युतीचा विषय मांडला आहे. जोगेंद्र कवाडे यांचा पक्ष संघर्षातून पुढे आला आहे आणि आमचा पक्षही संघर्षातून पुढे आला आहे. दोन्ही पक्षांचा संघर्ष साधा नव्हता, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

महिलेनं अर्ध्यारात्री असं काही मागवलं की डिलीव्हरी बॉयही हादरला; ऑर्डर घेऊन घरी पोहोचताच जे घडलं त्यानं..., पाहा VIDEO

Nashik Tourism: नाशिकमध्ये फिरायला गेलात? मग मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या या ५ किल्ल्यांना नक्की भेट द्या

Famous Singer Death: इंडियन आयडल फेम गायकाचे ४३ व्या वर्षी निधन; संगीत विश्वावर शोककळा

धनंजय मुंडे भाजपात जाणार? दादांच्या दौऱ्याला दांडी, फडणवीसांसोबत हजेरी

SCROLL FOR NEXT