प्रकाश आंबेडकर हे ‘रिपब्लिकन’ नाहीत, जोगेंद्र कवाडे यांचं रिपाइं ऐक्यावर मोठं विधान! 
मुंबई/पुणे

प्रकाश आंबेडकर हे ‘रिपब्लिकन’ नाहीत, जोगेंद्र कवाडे यांचं रिपाइं ऐक्यावर मोठं विधान!

रिपब्लिकन ऐक्याच्या मुद्द्यावरून पीआरपीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे.

प्रदीप भणगे

कल्याण : रिपब्लिकन ऐक्याच्या मुद्द्यावरून पीआरपीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर हे रिपब्लिकन नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत ऐक्याची चर्चा होऊ शकत नाही, असं प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी म्हटलं आहे. कल्याणच्या शासकीय निवासस्थान येथे सम्राट या सिनेमाच्या मुहूर्तासाठी प्रा. जोगेंद्र कवाडे आले होते.

हे देखील पहा :

यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला असता हे विधान केलं. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी सर्व रिपब्लीकन गटांनी एकत्रित येऊन निवडणूका लढल्या पाहिजेत. आमच्याकडून प्रयत्न सुरू आहेत, असं कवाडे म्हणाले.

त्यावर, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरु आहे की नाही? असा सवाल कवाडे यांना विचारला असता, प्रकाश आंबेडेकर हे स्वत:ला रिपब्लिकन मानत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत रिपब्लिकन ऐक्याची चर्चा होऊ शकत नाही. रामदास आठवले यांच्यासह राज्यस्तरीय नेत्यांसोबत आमची ऐक्याची चर्चा सुरू आहे, असं कवाडे यांनी स्पष्ट केलं.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाश्त्यासाठी बनवा स्वादिष्ट पालक पनीर पराठा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात बीटीबी भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांना जिल्हा न्यायालयाचा मोठा दिलासा

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

SCROLL FOR NEXT