JJ Hospital resident doctors strike Back Saam TV
मुंबई/पुणे

JJ Hospital resident doctors strike Back: मोठी बातमी! जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे

Strike Back: तिसऱ्या वर्षातील निवासी डॉक्टरांची थकित देणी देण्यात यावी या संदर्भात मागील चार दिवसांपासून डॉकटर संपावर होते.

सुरज सावंत

JJ Hospital: गेल्या ४ दिवसांपासून जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर होते. आज त्यांनी आपला हा संप मागे घेतला आहे. डॉ. रागिणी पारेख आणि तात्याराव लहाने यांना पदावरून मुक्त करावे, ही मागणी निवसी डॉक्टरांकडून करण्यात आली होती. (Latest JJ Hospital News)

वैद्यकीय आयोगाच्या नियमानुसार विभागातील रिक्त पदे भराण्यात यावीत. पहिल्या वर्षाच्या निवासी डॉक्टरांचे तीन महिन्यांचे थकित विद्यावेतन द्यावे. तिसऱ्या वर्षातील निवासी डॉक्टरांची थकित देणी देण्यात यावी या संदर्भात मागील चार दिवसांपासून डॉकटर संपावर होते. हा संप आता त्यांनी मागे घेतला आहे.

जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी यावर म्हटलं आहे की, मागील चार दिवसंपासून काही मागण्यांसाठी आम्ही संपावर होतो. याबाबत आमची मंत्री महोदयांसोबत बैठक झाली. आमच्या मागण्या त्यांनी मान्य केल्या असून पदभरती ही टप्याटप्याने भरण्याचे आश्वासन दिले आहे. आमच्या सर्व मागण्या एकून घेतल्या व त्यावर तोडगा काढल्याप्रकरणी सर्वांचे आभार. आज आम्ही संप मागे घेत असून आजपासूनच आम्ही पुन्हा कार्यरत होऊ, असं डॉ. शुभम सोनी, मार्ड प्रेसिडेन्ट यांनी म्हटलं.

तर डॉ. अभिजीत हेलगे, अध्यक्ष मध्यवर्ती मार्ड संघटना यांनी संप मागे घेतल्यावर म्हटलं आहे की, "तीन प्रमुख मागण्यांसाठी आम्ही संपावर होतो. डॉ. लहाने व पारेख याचं योगदान नाकारता येणार नाही. मात्र शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षणही तितकेच महत्वाचे आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी आमचं म्हणण एकून घेत तोडगा काढला आणि येथील २५ वर्ष सुरू असलेल्या हुकुमशाहीचा अंत झाला."

पद निर्मितीसाठी सोमवारपासून जाहिरात निघेल.बहुतांश मागण्या मान्य झाल्या असून उर्वरित मागण्या तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबधितांना दिलेल्या आहेत. त्यानुसार आज आम्ही संप (Strike) मागे घेतोय, असंही जे जे रुग्णालयातील (JJ Hospital) निवासी डॉक्टरांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

SCROLL FOR NEXT