JJ Hospital Resident Doctor Saam TV
मुंबई/पुणे

JJ Hospital Resident Doctor Strike: जे. जे रुग्णालयातील वाद चिघळणार?; मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

मागण्या मान्य न झाल्यास सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर

J J Hospital News: जे. जे रुग्णालयातील वाद मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. बुधवारी मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्राचे समन्वयक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह जे. जे. रुग्णालयातील नऊ डॉक्टरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अशात आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास जे. जे प्रश्नी मार्डने सोमवारपासून राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे. (Latets Marathi News)

निवासी डॉक्टरांच्या (Doctor) संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असताना आपल्या मागण्यांसाठी निवासी डॉक्टर ठाम आहेत. या डॉक्टरांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना पत्राद्वारे (Letter) मागण्या मान्य न झाल्यास सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

नेत्रशल्य चिकित्सा विभाग प्रमुख डॉ. रागिणी पारेख आणि डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडून होत असलेल्या छळाविरोधात आणि इतर मागण्यासाठी जे. जे. रुग्णालयातील ( J J Hospital) निवासी डॉक्टरांनी पुकारलेला आहे तो संप अजूनही सुरुच आहे.

जे जे मधील निवासी डॉक्टरांच्या मागण्या काय?

दोन्ही डॉक्टरांची डॉ. रागिणी पारेख आणि तात्याराव लहाने यांना पदावरून मुक्त करून ती पदे भरा.

18 वैद्यकीय आयोगाच्या नियमानुसार विभागातील पदे भरा.

पहिल्या वर्षाच्या निवासी डॉक्टरांचे तीन महिन्याचे थकित विद्यावेतन द्यावे.

तिसऱ्या वर्षातील निवासी डॉक्टरांची थकित देणी देण्यात यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्री राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; पाहा VIDEO

How Much Water To Drink Daily: 1, 2, 3, 4, की 5, दररोज किती लिटर पाणी प्यावे? नेमकं प्रमाण जाणून घ्या

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

Bigg Boss 20: 'बिग बॉस २०’मध्ये या आठवड्यात कोण होणार बेघर? काझी ते मेरी कॉमपर्यंत ७ स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार

Hiccups: उचकी का लागते? खरंच कोणी आठवण काढल्यावर उचकी येते?

SCROLL FOR NEXT