JJ Hospital Resident Doctor Strike
JJ Hospital Resident Doctor Strike Saam Tv
मुंबई/पुणे

JJ Hospital Resident Doctor Strike: डॉ. लहानेंसह 9 डॉक्टरांच्या राजीनाम्यानंतरही निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरुच; 750 डॉक्टर संपावर

Priya More

रुपाली बडवे, मुंबई

JJ Hospital: मुंबईतल्या जे जे रुग्णालयात (J J Hospital ) वेगवेगळ्या पदांवर काम करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांनी अचानक राजीनामे दिले. यामध्ये नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहान (Dr Tatyarao Lahane), डॉ. रागिणी पारेख (Dr. Ragini Parekh) यांच्यासह 9 वरिष्ठ डॉक्टरांचा समावेश आहे. या डॉक्टरांच्या राजीनाम्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. जेजे रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्स विभागातील सर्व डॉक्टर आणि प्राध्यापकांनी राजीनामा दिल्यानंतरही या निवासी डॉक्टरांचे आंदोलन (Resident Doctor Strick) सुरु आहे.

जेजे रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्स विभागातील डॉक्टर, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख विद्यार्थ्यांना त्रास देतात त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. विद्यार्थ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी अशी मागणी करत जेजे मार्डने बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरु केले होते. विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपानंतर डॉ. लहाने यांच्यासह नऊ डॉक्टरांनी राजीनामे दिले. त्यांच्या राजीनाम्यानंतर ही या निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरु आहे.

जेजे रुग्णालयातील 750 निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांच्यावर निवासी डॉक्टरांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्याकडून दादागिरी केली जाते आणि शस्त्रक्रिया करू दिल्या जात नसल्याचे निवासी डॉक्टरांनी आरोप केले आहेत. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांना स्टायपंड मिळत नाही याशिवाय इतरही मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. जेजे रुग्णालयातील काही मोजक्या निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरु आहे.

जेजे रुग्णालयात 750 निवासी डॉक्टर्स शिक्षण घेत आहेत. नेत्रशल्यचिकित्सा विभागात एकूण 28 निवासी डॉक्टर्स आहेत यामधील 18 निवासी डॉक्टर्स पहिल्या वर्षात तर 10 निवासी डॉक्टर्स दुसऱ्या वर्षात आहेत. 22 मे 2023 रोजी सध्या कार्यरत असणाऱ्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या २८ निवासी डॉक्टरांनी यासंदर्भात अधिष्ठांकडे मार्ड संघटनेमार्फत तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर निवासी डॉक्टरांनी आंदोलन सुरु केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

Nandurbar Crime: पुष्पा स्टाईलने सागवान लाकडाची तस्करी; जमिनीत पुरली ११ लाख रुपयांची लाकडं

Manoj Jarange Patil: उपोषणावर ठाम, निवडणुकीत फोडणार घाम; जरांगे उतरणार विधानसभेच्या मैदानात

RCB vs CSK IPL 2024: नॉकऑउट सामन्यात आरसीबी २००पार; CSK समोर २१९ धावांचं आव्हान

SCROLL FOR NEXT