Jitendra Awhad news Saam Tv
मुंबई/पुणे

Jitendra Awhad News : जितेंद्र आव्हाडांना ठाणे कोर्टात हजर केलं; कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

Jitendra Awhad News : यावेळी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी वर्तक नगर पोलिस स्टेशनबाहेर मोठी गर्दी केली होती.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

Jitendra Awhad Arrested: हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद करण्यासाठी गेल्यानंतर विवियाना मॉलमध्ये प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना ठाणे पोलिसांनी काल, शुक्रवारी अटक केली होती. त्यामुळे त्यांची कालची रात्र ही जेलमध्येच गेली होती. आज, शनिवारी सकाळी आव्हाड यांना पोलिसांनी ठाणे कोर्टात हजर केलं आहे. यावेळी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी वर्तक नगर पोलिस स्टेशनबाहेर मोठी गर्दी केली होती. (Har Har Mahadev movie controversy)

आज सकाळी जितेंद्र आव्हाडांना वर्तक नगर पोलिसांनी ठाणे कोर्टात हजर केलं. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनबाहेर आणि ठाणे कोर्टाबाहेर मोठी गर्दी केली होती. आव्हाडांंच्या अटकेप्रकरणी आता कोर्टात वाद-विवादाला सुरूवात झाली आहे. या युक्तीवादानंतर आव्हाडांना जेल मिळणार की बेल? याबाबत थोड्या वेळातच निर्णय होणार आहे.

हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करत राज्यभरातील काही संघटनांनी विरोध केला आहे. हर हर महादेव या चित्रपटाचे शो राज्यभरातील चित्रपटांमध्ये दाखवू नयेत, यासाठी राष्ट्रवादी (NCP) काँग्रेससह संभाजी ब्रिगेड यांसह विविध संघटनांनी या शो बंद पाडले होते.

ठाण्यातही जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी विवियाना मॉलमध्ये जाऊन शो बंद पाडला होता. त्यावेळी कार्यकर्त्यांसोबत प्रेक्षकाची झटापट झाली होती. एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत होतं. त्यानंतर आव्हाड यांच्यावर टीका झाली होती. या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर ठाण्यातील वर्तक पोलिसांनी आव्हाडांना अटक केली होती.

याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर गंभीर आरोप केले होते. आव्हाडांनी ट्विट केलं होतं की, आज दुपारी साधारण १ वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो, नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं की, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले की मी काही करू शकत नाही. वरून आदेश आले आहेत. तुम्हाला अटक करावी लागेल, असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही, असंही ते म्हणाले होते.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी अटक केल्यानंतर ठाण्यातील न्यायालयात हजर केलं गेलं. त्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कार्यकर्ते न्यायालय परिसरात गोंधळ घालू नये यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली आहे. आव्हाड साहेब संघर्ष करो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT