Jitendra Awahad Saam TV
मुंबई/पुणे

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांकडून अटक, ठाण्यात मॉलमध्ये प्रेक्षकाला झाली होती मारहाण

Jitendra Awhad Latest News | हर हर महादेव या चित्रपटाचे शो राज्यभरातील चित्रपटांमध्ये दाखवू नयेत, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह संभाजी ब्रिगेड यांसह विविध संघटनांनी या शो बंद पाडले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jitendra Awhad Detained : हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद करण्यासाठी गेल्यानंतर विवियाना मॉलमध्ये प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात त्यांची चौकशी केली जाणार आहे. (Har Har Mahadev movie controversy)

हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करत राज्यभरातील काही संघटनांनी विरोध केला आहे. हर हर महादेव या चित्रपटाचे शो राज्यभरातील चित्रपटांमध्ये दाखवू नयेत, यासाठी राष्ट्रवादी (NCP) काँग्रेससह संभाजी ब्रिगेड यांसह विविध संघटनांनी या शो बंद पाडले होते.

ठाण्यातही जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी विवियाना मॉलमध्ये जाऊन शो बंद पाडला होता. त्यावेळी कार्यकर्त्यांसोबत प्रेक्षकाची झटापट झाली होती. एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत होतं. त्यानंतर आव्हाड यांच्यावर टीका झाली होती. आता या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ठाण्यातील वर्तक पोलिसांनी आव्हाडांना अटक केली आहे.

याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. आज दुपारी साधारण १ वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो, नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले.

मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं की, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले की मी काही करू शकत नाही. वरून आदेश आले आहेत. तुम्हाला अटक करावी लागेल, असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही, असंही ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनाठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी अटक केल्यानंतर आता थोड्याच वेळात ठाण्यातील न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कार्यकर्ते न्यायालय परिसरात गोंधळ घालू नये यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली आहे. आव्हाड साहेब संघर्ष करो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात अजून एक विषारी दारूचा बळी

Marriage tips : मुलगा कितीही श्रीमंत असला तरी 'या' १ सवयीमुळे मुलीचं आयुष्य होईल उद्ध्वस्त; लग्नाआधीच व्हा सावधान

PSI Transfer : महाराष्ट्रात बदल्यांचा धडाका! ४३ PSI सह ३९९ कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली

भाजप सरकारमध्ये मोठा फेरबदल होणार; कोणाकोणाला मिळणार डच्चू?

Famous Actor Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टी शोकसागरात

SCROLL FOR NEXT