Jitendra Awhad
Jitendra Awhad Saam Tv
मुंबई/पुणे

माझा जन्म 354 आणि 376 साठी झालेला नाही, विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड भावूक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाणे : विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  भावूक झाले. जयंत पाटलांसमवेत पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका मांडली.

माझा जन्म 354 आणि 376 साठी झालेला नाही. माझ्यावर कोणताही आरोप केला असता तर चाललं असत पण 354 मला मान्य नाही. मी आयुष्यात असं काही करू शकत नाही. समाजात माझी मान खाली जाईल असा गुन्हा माझ्यावर टाकला जात असून हा कटाचा भाग असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.  (Politics)

354 चा गुन्हा दाखल झाल्यावर माझ्या मुलीला अनेक जण प्रश्न विचारत आहेत. एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण होऊ नये. ही कारवाई माझ्या मनाला लागली आहे. समाजात माझी बदनामी करण्यसाठी हे षडयंत्र असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.

माझ्यावर खुनाचे षडयंत्र रचल्याचा आरोप लावला असता तरी चालले असतं. माझ्याविरोधात ओढूनताणून गुन्हा नोंदवला जात आहे. विनयभंगाचा आरोप मान्य नाही, त्यापेक्षा राजकारणात नकोच असंही आव्हाड यांनी म्हटले.

आव्हाडांच्या भूमिकेनंतर त्यांचं मन वळवण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वत: त्यांच्या घरी पोहोचले. यावेळी बोलताना जयंत पाटलांना काही प्रश्न उपस्थित केले. माझा राज्य सरकार आणि पोलिसांना प्रश्न आहे की काल झालेली घटना ही 354 मध्ये कुठे बसते हे दाखवून द्या, असा सवाल जयंत पाटलांनी विचारला.

महाराष्ट्र पोलीस आणि ठाणे पोलिसांनी हे प्रकरण या गुन्ह्यात कसं बसवलं. कायद्याची मोडतोड कशी होते. गृहमंत्र्यांनी नेमकं काय सुरू आहे, ते बघावं. मुख्यमंत्री गाडीत असताना, पोलीस अधिकारी आणि पोलीस बंदोबस्त असताना विनयभंग कसा होईल? मनात राग ठेऊन सरकारने ही कृती केली. त्या महिलेने मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली. त्यानंतर रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला. यावरुन मुख्यमंत्री विरुद्ध जितेंद्र आव्हाड असं चित्र निर्माण होत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambegaon Rain News | पुण्यातील आंबेगाव तालुक्यात जोरदार पाऊस

Amravati News: गर्दी कमी करा असं सांगितलं म्हणून डॉक्टरला मारहाण, तिघांना अटक, घटना CCTV मध्ये कैद

Shantigiri Maharaj News | या उमेदवाराने थेट मोदींची भेट नाकारली! कारण काय?

Pimpri Chinchwad Hording: घाटकोपरनंतर आता पिंपरीतही होर्डिंग कोसळलं

Latur Marriage Story | पोलिसांनी शोधलं आणि आईवडिलांसमोर लग्न लावलं! अजब-गजब प्रेमकहाणी

SCROLL FOR NEXT