...जयंती महादेव गोविंद रानड्यांची...फोटो मात्र नाना शंकरशेठ यांचा! Saam Tv
मुंबई/पुणे

...जयंती महादेव गोविंद रानड्यांची...फोटो मात्र नाना शंकरशेठ यांचा!

महादेव गोविंद रानडे यांना अभिवादन करताना सर्व राजकीय पक्षांकडून एक चूक झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई - आज (१८ जानेवारी) न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची जयंती आहे. मात्र न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना अभिवादन करताना सर्व राजकीय पक्षांकडून एक चूक झाली आहे. त्यांनी महादेव गोविंद रानडे यांना अभिवादन करताना नाना शंकर शेठ यांचा फोटो वापरला आहे. न्यायमूर्ती रानडे यांची पुण्यतिथी 16 जानेवारी आणि आज (१८ जानेवारी) जयंती आहे. मात्र अनेक बड्या नेत्यांनी नाना शेठ यांचा फोटो लावून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना सोशल मेडियावर पोस्ट टाकत अभिवादन केले आहे.

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे महाराष्ट्रातील समाजसुधारक होते, तसेच ते अर्थशास्त्रज्ञ व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे ते अध्यक्षही होते. १८८५ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. रानडे यांना आधुनिक भारताच्या इतिहासात महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीत महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षणाचा प्रसार व्हावा, स्त्रियांनाही शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी मुलींच्या शाळा सुरू केल्या.

त्यांनी शिक्षण, समाजसेवा, राजकारण तसेच आर्थिक बाबतीत अमूल्य कार्य केले. काही काळ त्यांनी शिक्षक, संस्थानाचे सचिव, जिल्हा न्यायाधीश म्हणून विविध ठिकाणी काम केले. इ.स. १८९३ साली मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. रानडे यांनी १६ जानेवारी १९०१ च्या रात्री जस्टीन मेकार्थी याचे ‘हिस्ट्री ऑफ अवर ओन टाईम्स’ हे पुस्तक वाचायला घेतले आणि पुस्तक वाचायला बसले नाहीत तोवर त्यांना त्रास सुरू झाला व त्यांची जीवनयात्रा संपली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LICची मोठी घोषणा! बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी, १७ सप्टेंबरपर्यंत मिळणार विशेष सवलती

Online Gaming Regulation Bill: ऑनलाइन गेमिंगचा सरकारकडून 'गेम'; दोन्ही सभागृहात ऑनलाइन गेमिंग विधेयक मंजूर

निवडणुकीत ठाकरेंचा पराभव, एकनाथ शिंदे म्हणाले... | VIDEO

Khandeshi Puranpoli Recipe : खानदेशी पुरणपोळी 'मांडे', बैलपोळ्यासाठी खास गोड पदार्थ

Sprouts Curry : पावसाळ्यात भाजी कोणती करावी सुचत नाही? बनवा मिक्स कडधान्याची उसळ

SCROLL FOR NEXT