Jayant Patil  Saam TV
मुंबई/पुणे

Jayant Patil: नवाब मलिकांचा पदभार सांभाळण्यासाठी राखी जाधव आणि नरेंद्र राणे यांची नियुक्ती - जयंत पाटील

नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली होती.

सुरज सावंत

मुंबई: राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अनुपस्थितीत त्यांचा पदभार सांभाळण्यासाठी राखी जाधव या कार्यध्यक्ष म्हणून आणि नरेंद्र राणे यांची नियुक्ती करण्यात आलीये. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबतची माहिती दिलीये (Jayant Patil Says Rakhi Jadhav And Narendra Rane Will Be Appointed In The Absence Of Nawab Malik).

नवाब मलिकांच्या राजीनाम्याला राष्ट्रवादीचा विरोध

नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अटकेनंतर मुंबईच्या अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार दुसऱ्याकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. कारण, नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली होती. त्यासाठी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.

अखेर त्यावर राष्ट्रवादीकडून निर्णय घेण्यात आला असून नवाब मलिकांचा पदभार सांभाळण्यासाठी राखी जाधव या कार्यध्यक्ष म्हणून आणि नरेंद्र राणे यांची नियुक्ती करण्यात आलीये.

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करावी, अशी पदाधिकाऱ्यांची मागणी होती. या दोघांच्या कार्यकाळात मुंबईत राष्ट्रवादी आणखी चांगलं काम करेल, असा विश्वासही जयंत पाटलांनी (Jayant Patil) व्यक्त केला.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT