नारायण राणे विश्रांतीसाठी मुंबईत, गुरुवारपासून पुन्हा जन-आशीर्वाद यात्रेला सुरुवात – प्रवीण दरेकर Saam Tv
मुंबई/पुणे

नारायण राणे विश्रांतीसाठी मुंबईत, गुरुवारपासून पुन्हा जन-आशीर्वाद यात्रेला सुरुवात – प्रवीण दरेकर

मुंबईमध्ये नारायण राणे यांच्या प्रकृतीची तपासणी केली जाणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांना कानशिलात लगवण्याच्या वक्तव्यावरून आज संपूर्ण दिवसभर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. नारायण राणे Narayan Rane यांच्या प्रकरणावर आणि जामीन अर्जावर महाड न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी राणे यांना अखेर जामीन मंजूर केला असून. त्यांची अटक ही बेकायदेशीर असल्याचा निकाल कोर्टाकडून देण्यात आला आहे. नारायण राणे यांच्यामार्फत ऍड.अनिकेत निकम यांनी बाजू मांडली आहे.

दरम्यान, नारायण राणे यांच्यासाठी पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे विधान केले होते व मुख्यमंत्री पदाच्या गरीमेला धक्का लावण्याचा प्रयत्न केला असल्याचा युक्तिवाद सरकारी वकीलांमार्फत करण्यात आला होता. राज्य सरकारच्या वतीने वकील भूषण साळवी यांनी युक्तिवाद केला होता.

त्यामुळे अश्याच पद्धतीचे विधान पुन्हा केले जाण्याची शक्यता गृहीत धरून राणेंना सात दिवसांची कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, नारायण राणेंच्या वकिलांचा युक्तिवाद यावेळी प्रभावी ठरल्याचे दिसून आले आहे. अखेर नारायण राणेंच्या जामीन अर्जावर अखेर निर्णय झाला असून महाड कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. मात्र, 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबरला रायगड गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार आहे. या दरम्यान, कागदपत्रे आणि पुराव्यांसोबत छेडछाड करता येणार नाही, असंही महाड कोर्टानं राणेंना बजावलं आहे. त्यामुळे नारायण राणेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या संपूर्ण घटनेवर आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी दरेकर यांनी नारायण राणे यांच्या पुढील कार्यक्रमाची आणि जनआशीर्वाद यात्रेबाबतची माहिती दिली. जामीन मंजूर केल्यानंतर नारायण राणे आता मुंबईमध्ये १ दिवस विश्रांती घेतल्यानंतर गुरुवारपासून पुन्हा जनआशीर्वाद यात्रा सुरु करणार आहे, अशी माहिती प्रवीण दरेकर यांच्याकडून देण्यात आली आहे. मुंबईमध्ये नारायण राणे यांच्या प्रकृतीची तपासणी केली जाणार आहे अशी देखील माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली. त्यामुळे राणे यांची जन-आशीर्वाद यात्रा आज होणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, उर्वरित यात्रा ते पूर्ण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

SCROLL FOR NEXT