सचिन गाड, मुंबई
जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस (Jaipur- Mumbai Superfast Express) गोळीबार प्रकरणानंतर (Jaipur-Mumbai Train Firing Case) आरपीएफने मोठा निर्णय घेतला आहे. आरपीएफच्या एस्कॉर्ट पार्टीला मुंबई विभागात एक्स्प्रेस ट्रेनमध्ये यापुढे स्वयंचलित शस्त्र न वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
स्वयंचलित रायफलऐवजी पिस्तूल वापरण्याचे आदेश आरपीएफने दिले आहेत. जयपूर एक्स्प्रेस गोळीबाराच्या घटनेमध्ये आरोपी चेतन सिंहने (Chetan Singh) AR-M1 रायफलने चौघांची हत्या केली होती. या घटनेनंतर आरपीएफकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये ३१ जुलैला पहाटे पावणे सहाच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. आरपीएफ जवान चेतन सिंहने धावत्या ट्रेनमध्ये आपल्या सहकाऱ्यासह प्रवाशांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारामध्ये आरपीएफ पोलिसासह चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता तर काही जण जखमी झाले होते. दहिसर ते मीरारोड रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली होती. या घटनेनंतर ट्रेनच्या लोको पायलटने तात्काळ ट्रेन थांबवली. त्यानंतर चेतन सिंहने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याला अटक केली.
या गोळीबार प्रकरणाची आता उच्च स्थरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. या समतीमध्ये ५ जण असून ते लवकरच या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करणार आहेत. त्याचसोबत या गोळीबारामध्ये मृत्यू झालेल्या चौघांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर आरपीएफ जवान आयएसए टिकाराम यांना सरकारी नियमांनुसार मोबदला देण्यात येणार आहे.
तसंच या प्रकरणातील आरोपी चेतन सिंहचे मानसिक संतुलन बिघडले आहे. यासाठी तो गेल्या ६ महिन्यांपासून उपचार घेत असल्याचे देखील चौकशीतून समोर आले आहे. आता चेतन सिंहची मनोवैज्ञानिक चाचणी केली जाणार आहे. आरोपी पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करत नसल्याची देखील माहिती समोर आल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.