KDMC News Saam Tv
मुंबई/पुणे

KDMC News: कल्याण डोंबिवलीतील प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार, ७०० प्रकरणे निकाली निघणार

Kalyan Dombivli News: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नव्या पुनर्वसन धोरणास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. त्यानुसार महापालिकेच्या पुर्नवसन समितीकडून ७०० प्रकल्प बाधितांची प्रकरणे येत्या २० जानेवारीपर्यंत निकाली काढण्यात येणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

Kalyan Dombivli News

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नव्या पुनर्वसन धोरणास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. त्यानुसार महापालिकेच्या पुर्नवसन समितीकडून ७०० प्रकल्प बाधितांची प्रकरणे येत्या २० जानेवारीपर्यंत निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी दिली आहे.

या बाधितांना बीएससयूपीतील घरे दिली जाणार आहेत. त्यामुळे रिंग रोड आणि अर्वधट असलेल्या ठाकूर्ली रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाला गती मिळणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी शहरात एमएमआरडीएच्या माध्यमातून रिंग रोड प्रकल्प केला जात आहे. दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यान ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यान ८५० घरे बाधित होत होती. (Latest Marathi News)

त्यांनी प्रकल्पाच्या कामाला जागा दिली नाही. त्यामुळे रिंग रोडचे या टप्प्यातील २० टक्के काम रखडले होते. ८५० प्रकल्प बाधितांपैकी ४०० बाधित बीएसयूपी प्रकल्पातील घरासाठी पात्र ठरले आहे. पुनर्वसन समितीच्या बैठकीत आणखीन १०० बाधितांची प्रकरणे ठेवली आहेत. या शिवाय २५६ प्रकल्प बाधितांचा बायो मेट्रीक सर्व्हे सहाय्यक संचालक नगररचना विभागाकडून मालमत्ता विभागासह पुनर्वसन समितीला यादी प्राप्त झाली असल्याचे गुळवे यांनी सांगितले.

त्याचबराेबर ठाकूर्ली उड्डाण पूलाच्या कामामुळे बाधित झालेल्या ९१ बाधितांची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.जुन्या धोरणानुसार १९९६ पूर्वीच्या प्रकल्प बाधितांना पुनर्वसनाचा फायदा मिळत होता. आत्ता त्याची डेडलाईन वाढविल्याने १९९६ नंतर बाधित झालेल्यांनाही होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

SCROLL FOR NEXT