Global attention turns to Iran after Donald Trump questions the status of Supreme Leader Mojtaba Khamenei amid escalating Middle East tensions. Saam Tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी: यंदा शिया मुस्लिम समाज ईद साजरी करणार नाही! नेमकं कारण काय?

Eid al-Fitr : इराणमधील तणावपूर्ण परिस्थिती आणि नेत्याच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर शिया मुस्लिम समाजाने यंदाची रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरात दुःखाचे वातावरण असून फक्त नमाज अदा केली जाणार आहे.

Namdeo Kumbhar

सागर आव्हाड, प्रतिनिधी

why Shia Muslims decided to celebrate Eid simply this year global news : गेल्या काही दिवसांपासून इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद जगभरात उमटत आहेत. इराणने 'हार्मुस बंदर' (Strait of Hormuz) बंद केल्यामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. भारतात व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. तर घरगुती गॅस मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. अशातच पवित्र रमजान महिना संपत आला असून दोन दिवसांवर ईद आली आहे. मात्र, अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते रहेबर सय्यद अली खामनाई शहीद झाल्याने जगभरातील मुस्लिम समाजात संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर, यंदाची रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरवर्षी रमजान ईदच्या दिवशी नमाज, नवीन कपडे आणि शिरखुर्मा असा मोठा उत्साह असतो. मात्र, शिया मुस्लिम समाजाचे प्रमुख रहेबर सय्यद अली खामनाई यांच्या शहादतीमुळे यंदा हा समाज शोक व्यक्त करत आहे. शिया मुस्लिम समाजाच्या वतीने यंदा रमजान ईद साध्या पद्धतीने साजरा केली जाणार असल्याचं निर्णय घेण्यात आलं आहे.

शिया मुस्लिम धर्मगुरू मौलाना शबीह एहसन काझमी म्हणाले की, "हे युद्ध इराणवर लादण्यात आले असून इस्रायल आणि अमेरिकेचा हा दहशतवाद आहे. या युद्धात अनेक निष्पाप बालकांचा बळी गेला आहे. खामनाई यांच्या निधनामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण असून इस्रायल आणि अमेरिकेचा क्रूर चेहरा जगासमोर आला आहे."

या दुःखद प्रसंगामुळे शिया समाजाने यंदा ईद साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणीही नवीन कपडे परिधान करणार नाही किंवा गोड पदार्थ बनवणार नाही. केवळ ईदची नमाज अदा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पाकिस्तानी गँगस्टर शहबाज भट्टीसोबत लिंक असल्याच्या माहितीवरून दहा तरुणांना नागपूर ATS ने घेतलं ताब्यात

Viral Video: ‘मी ड्रायव्हर आहे, नोकर नाही’, सिगारेट ओढणाऱ्या प्रवाशाला ड्रायव्हरने टॅक्सीतून उतरवलं, व्हिडीओ झाला व्हायरल

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्'साठी छाया कदम यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; 'जठाई'चा लूक पाहून व्हाल थक्क

स्मार्ट मीटर बसण्यापूर्वीच ४४० व्होल्टचा झटका; पाठवलं ५ महिन्यांचं वीजबिल, धक्कादायक प्रकरणाने राज्यात खळबळ

Shocking: नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकांची आत्महत्या, चिंचेच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT