Vishwas Nangare Patil  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Latest News : विश्वास नांगरे पाटील पुण्याचे नवे आयुक्त? शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या व्हॉट्सॲप स्टेटसमुळे चर्चा

Vishwas Nangare Patil new CP of Pune : मात्र गृहमंत्रालयाच्या आदेशाआधीच वरिष्ठ अधकाऱ्यांच्या बदल्या कार्यकर्त्यांना आधीच कशा कळतात? हा प्रश्न कायम आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News :

महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील सतत चर्चेत असतात. विश्वास नांगरे पाटील पु्न्हा एकदा चर्चेत आले आहेत. पुण्याच्या नवीन पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा सध्या पुण्यात आणि राज्यभरात सुरु आहे. शिंद गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्टेटसमुळे या चर्चांना उधाण आलं आहे.

विश्वास नांगरे पाटील यांची पुण्याच्या आयुक्तपदी नियुक्ती होईल, असा विश्वास शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना आहे. कारण गृहमंत्रालयाच्या आदेशापूर्वीच शिंदे गटतील एका पदाधिकाऱ्याने व्हॉट्सॲपवर याबाबत स्टेटस ठेवलं आहे. या स्टेटसची चर्चा सध्या पुण्यासह राज्यात आहे. (Latest Marathi News)

'बॉस लवकरच पुण्यात?', असा मजकूर या पदाधिकाऱ्याने स्टेटसवर लिहिला आहे. सोबत विश्वास नांगरे पाटील यांचा फोटो लावला आहे. या स्टेटसची पुण्यासह राज्यभरातील आयपीएस आणि वरीष्ठ अधिकारी यांच्यात चर्चा सुरु आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र गृहमंत्रालयाच्या आदेशाआधीच वरिष्ठ अधकाऱ्यांच्या बदल्या कार्यकर्त्यांना आधीच कशा कळतात? हा प्रश्न कायम आहे. विश्वास नांगरे पाटील सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

दुसरीकडे पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचा देखील कार्यकाळ पूर्ण झालेला नाही. मात्र पुढील २-३ महिन्यात रितेश कुमार यांची पदोन्नती होत आहे. त्यामुळे पुण्याची जबाबदारी कुणावर दिली जाणार याबाबत चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhan Bhavan : मोठी बातमी! विधानभवानाला बॉम्बने उडवण्याची धमकी

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

Scalp Massage Tips: आठवड्यातून दोन वेळा करा 'स्काल्प मसाज', केसांची होईल भरभर वाढ

Maternity Leave : कोणताही नियम महिलेला मातृत्व रजा घेण्यापासून रोखू शकत नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Monalisa Wedding : मोनालिसानं फरमानसोबत पळून जाऊन केलं लग्न, कुंभमेळ्यामुळे रातोरात झाली होती प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT