SSC, HSC Exam  Saam Tv
मुंबई/पुणे

10 वी 12 वी परीक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांची मोठी माहिती, म्हणाल्या...

राज्यातील १० वी आणि १२ वीच्या परिक्षा जवळ येत आहेत. परंतु सध्या राज्यात कोरोनाचे सावट आहे.

सुमित सावंत

पुणे: राज्यातील १० वी आणि १२ वीच्या परिक्षा जवळ येत आहेत. परंतु सध्या राज्यात कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे परिक्षा आफलाईन होणार की आनलाईन असा संभ्रम विद्यार्थांच्या मनात आहे. त्याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी माहिती दिली आहे. राज्यमंत्र्यांची त्या बाबत बैठक झाली आहे. खूप गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. आज कोरोनाच्या (Corona) स्थितीचा आढावा घेणार आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत आढावा घेवून पुढील काय तो निर्णय घेवू असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. पुरवणी परीक्षा असते, परीक्षेचा निकाल लागला नंतर पुनः परीक्षेला बसवाव लागतंय. त्यानंतर ऍडमिशन होतं, बऱ्याच गोष्टी एकावर एक आधारित असतात, त्यामुके विचार करून निर्णय घेतला जाणार असल्याचं गायकवाड म्हणाल्या. (SSC-HSC Exam Update)

आम्ही बोर्ड, SERT शी चर्चा करतोय, विचार करून योग्या तो निर्णय घेतला असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. राज्यातील शिक्षक संघटना, शिक्षक तज्ञ, मुख्याध्यापक या सगळ्यांशी चर्चा करून आराखडा ठरवू. त्याचबरोबर ११ वीच्या विद्यार्थांचे ऍडमिशन वेळेत व्हावेत ही देखील अपेक्षा असल्याचे गायकवाड म्हणाल्या. पुढे बोलतना त्यांनी महत्त्वाचं विधान केले आहे. त्या म्हणाल्या सध्यातरी ज्या तारखेला परिक्षा ठरल्या आहेत, त्याच तारखेला होतील बाकी निर्णय १५ तारखेनंतर घेवू.

आज देशात महात्मा गांधींची पुण्यस्थी साजरी होत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हुतात्मा दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी काँग्रेस नेते मुंबईमध्ये आले होते. त्यावेळी वर्षा गायकवाड बोलत होत्या. स्वच्छता, अहिंसा मानणाऱ्या गांधीजींचे गोळीने त्यांचे विचार संपु शकत नाही , हे जगाने मान्य केलं आहे असे गायकवाड यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. त्याचबरोबर त्यांनी Why I Killed Gandhi या चित्रपटावर देखील आपले मत व्यक्त केले आहे. अमोल कोल्हे यांनी आत्मक्लेशाचा निर्णय घेतला त्याचं स्वागत देखील त्यांनी केले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

Success Story: १५०० रूपयांच्या बिझनेसला ३ कोटींपर्यंत पोहोचवलं, जाणून घेऊया संगीता यांची यशोगाथा

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 'हे' व्यायम नक्की करून बघा

SCROLL FOR NEXT