Mumbai Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या सासऱ्यांसह तिघांना अटक, मुंबई पोलिसांची कारवाई; नेमकं कारण काय?

Mumbai News : मुंबईतील भायखळा परिसरात झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात युसूफ पठाण यांच्या सासऱ्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. एका किरकोळ वादातून मोठा हल्ला झाला असून एक आरोपी फरार आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • किरकोळ वादातून मोठा राडा

  • माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांच्या सासऱ्यासह तिघांना अटक

  • एक आरोपी फरार असून पोलिसांचा शोध सुरू

  • जखमींवर उपचार सुरू, तपास सुरू आहे

  • सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांची कारवाई

Team India Yusuf Pathan Player Father In law Arrested मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांचे सासरे आणि मेहुण्याला पोलिसांनी अटक केली आहे. भायखळा परिसरात एका तरुणाला आणि त्याच्या नातेवाईकांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आता या प्रकरणात कोणते नवीन वळण येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास स्थानिक रहिवासी युसूफ खान हे आपल्या कारने घरी जात होते. वाटेत रस्त्यातील खड्ड्यातून गाडी गेल्यामुळे पाणी उडाले आणि ते शोएब खान यांच्या अंगावर पडले. यानंतर युसूफ खान यांनी गाडीतून खाली उतरून शोएब खान यांची माफी मागितली. तरीसुद्धा संतापलेल्या शोएब खान यांनी युसूफ यांना शिवीगाळ करत बांबूच्या काठीने कारची काच फोडली आणि युसूफ खान यांना जखमी केलं.

रस्त्यावर झालेल्या या जोरदार राड्यानंतर युसूफ खान आपल्या कुटुंबासोबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेले. मात्र वाटेत त्यांची भेट युसूफ पठाण यांचे सासरे खालिद खान यांच्याशी झाली. यानंतर पुन्हा वाद उफाळला आणि खालिद खान, त्यांचा मुलगा उमरशाद खान, शोएब खान आणि शहबाज पठाण या चौघांनी मिळून युसूफ खान आणि त्यांच्या नातेवाईकांवर बांबूच्या काठ्या आणि बेसबॉल बॅटने भीषण हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, युसूफ खानचे कुटुंबीय आणि युसूफ खान दोघेही गंभीर जखमी झाले.

याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून भायखळा पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत खालिद खान, उमरशाद खान आणि शोएब खान या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, शहबाज पठाण फरार असून, इतर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्यांना २ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली, ज्याच्या आधारावर त्यांनी ही कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT