Indapur Container Accident Video Saam TV
मुंबई/पुणे

Indapur News : जेवण नाकारल्याने मद्यपी चालक संतापला, कंटेनर गरागरा फिरवला अन् हॉटेलमध्ये घुसवला; थरारक VIDEO

Indapur Container Accident Video : हॉटेल चालकाने जेवण देण्यास नाकारल्याने मद्यपी चालक संतापला. त्याने थेट कंटेनरने धडक देऊन हॉटेलसमोरील चारचाकी वाहनांचा चुराडा केला. इतक्यावरच न थांबता कंटेनर हॉटेलमध्येही घुसवला.

Satish Daud

मंगेश कचरे, साम टीव्ही बारामती

हॉटेल चालकाने जेवण देण्यास नाकारल्याने मद्यपी चालक संतापला. त्याने थेट कंटेनरने धडक देऊन हॉटेलसमोरील चारचाकी वाहनांचा चुराडा केला. इतक्यावरच न थांबता कंटेनर हॉटेलमध्येही घुसवला. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.

मात्र, कंटेनरसह हॉटेलचे मोठे नुकसान झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी मद्यपी कंटेनर चालकाला ताब्यात घेतलंय. त्याच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर चालक हा सोलापूर येथून पुण्याच्या दिशेने येत होता.

हिंगणगाव परिसरात आल्यानंतर त्याने एका हॉटेलसमोर कंटेनर थांबवला. त्यानंतर जेवणासाठी कंटेनर चालक हा हॉटेलमध्ये गेला. मात्र, हॉटेल बंद असल्याने तेथील कामगारांनी त्याला जेवण नाकारले. मद्यपान केले असल्याने कंटेनर चालकाला राग अनावर झाला.

त्याने जेवणासाठी तगादा लावला. परंतु हॉटेलमधील कामगारांनी त्याला बाहेर हाकलून लावले. याच गोष्टीचा राग मनात धरून कंटेनर चालकाने हॉटेलसमोर उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. इतक्यावरच न थांबता त्याने कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसवला.

सुदैवाने हॉटेल बंद असल्याने तिथे कोणतेही नागरिक उपस्थित नव्हते. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. अंगाचा थरकाप उडवणारा हा प्रकार स्थानिकांनी आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला. या प्रकारानंतर त्यांनी कंटेनर चालकाला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Tips: उन्हाळ्यात लग्नसराईसाठी १० मिनिटात असा करा ग्लॅमरस मेकअप, घाम आल्यावरही मेकअप तसाच राहिलं

Tamil Nadu Politics : थलापती विजय यांच्यासमोर पेच वाढला; राज्यपालांनी दुसऱ्यांदा माघारी धाडलं, TVK समोर पर्याय काय?

Maharashtra News Live Update: वांगणी आणि परिसरात जोरदार पाऊस, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी

उल्हासनगर रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूनंतर राडा; डॉक्टरांवर हल्ला अन् हॉस्पिटलची तोडफोड|VIDEO

Thalapathy Vijay: थलपती विजयवर दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं अपघातात निधन, पाणावलेल्या डोळ्यांनी दिला अखेरचा निरोप

SCROLL FOR NEXT