Income Tax Department conducting raids in Pune saam tv
मुंबई/पुणे

Pune IT Raids : पुण्यात प्राप्तिकर विभागाचे ८ ठिकाणी छापे; बडा उद्योजक-बिल्डर रडारवर

Income Tax Department conducting raids : पुण्यात बिल्डर आणि उद्योजकांच्या कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने छापे मारले.

Prachee kulkarni

Pune IT Raids : बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांमध्ये प्राप्तिकर विभागाकडून 'पाहणी' केल्याची घटना चर्चेत असतानाच, पुण्यात आज, बुधवारी प्राप्तिकर विभागाने आठ ठिकाणी छापे टाकले. बड्या बांधकाम व्यावसायिकाशी संबंधित कार्यालयांवर हे छापे टाकण्यात आले आहेत. (Latest Breaking News)

पुणे येथील (Pune) बडा उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिकाशी संबंधित कार्यालयांवर बुधवारी सकाळी प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax Raid) अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. संबंधित उद्योजकाच्या घर आणि कार्यालयांची झाडाझडती भल्या पहाटेपासूनच सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कार्यालयासह घर आणि अन्य ठिकाणी देखीलही झडती घेतली जात आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयातून ही तपासणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ()

पुण्यातील बडे प्रस्थ असलेल्या या बांधकाम व्यावसायिकावर प्राप्तिकर विभागाची छापेमारी सुरू झाल्यानं पुण्यातील उद्योगविश्वात खळबळ उडाली आहे. त्यांचे राज्यातील बड्या राजकारण्यांशी सलोख्याचे आणि निकटचे संबंध असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात एका संशयताला SIT ने घेतले ताब्यात

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

केतनच्या हत्येमागचं डिजिटल कनेक्शन उघड, गुगलवर शोधले पर्याय, लोहगडावर सराव

SCROLL FOR NEXT