Ajit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

राज्यात पुन्हा कोरोना निर्बंध लागणार? अजितदादांचं महत्वाचं वक्तव्य

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागणार का? असे प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहेत.

Shivani Tichkule

पुणे - एकीकडे महाराष्ट्रात मास्कसक्तीचे निर्बंध हटवण्यात आले आहे. तर दुसरीकडे कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागणार का? असे प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहेत. पुण्यातल्या शिवाजीनगर इथल्या पोलीस मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते यावेळी ते बोलत होते.

हे देखील पाहा -

या कार्यक्रमात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात निर्बंध लागू शकतात तसे टास्क फोर्स शी बोलून निर्णय घेणार असलयाचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पुन्हा मास्कसक्ती करायची की नाही याबाबाद देखील चर्चा झाली. यावेळी आजच्या पवार यांनी नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले.

सध्या मास्क वापरणं ऐच्छिकच आहे. याबाबत टास्क फोर्स आणि तज्ज्ञांचा सल्ला घेत आहोत. जर रुग्णसंख्येचे प्रमाण वाढत गेले आणि टास्क फोर्सने सूचना दिल्या तर काही निर्बंध लागू लागू शकतात असे देखील अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यातल्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Filmmaker Death : प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचं निधन, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, बॉलिवूडवर शोककळा

Maharashtra Live News Update: आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात

ज्येष्ठ खासदाराचे दुर्दैवी निधन, फुटबॉल खेळताना मैदानातच कोसळले, देशावर शोककळा!

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT