पुणे : लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींमध्ये 6 महिन्यांपर्यंत 91 टक्के अँण्टीबॉडीज आढळतात त्याचबरोबर लसीपासून 6 महिने पुर्ण संरक्षण मिळतं असा निष्कर्ष पुण्यातील बी जे मेडीकल (B.J. Medical) आणि ससून हॉस्पिटलच्या अभ्यासात समोर आला आहे. ससून हॉस्पिटलच्याच 558 कर्मचाऱ्यांवर हा अभ्यास केला आहे आणि अभ्यासाअंती हा निष्कर्ष काढला गेला आहे. पहिल्या तीन महिन्यात 96 टक्के तर चौथ्या महिन्यात ते 100 टक्के होतं आणि सहा महिन्यांत थोडीशी घट होऊनही 91 टक्के अँण्टीबॉडीज आढळतात. बुस्टर डोस ऐवजी राहिलेल्या लोकसंख्येचं लसीकरण (Corona Vaccination) पुर्ण करण्याचा महत्वाचा निष्कर्ष अभ्यासातून समोर आला आहे. बी जे मेडीकल कॉलेजचे प्राध्यापक आणि मेडीसीन विभागाचे प्रमुख प्रा. मुरलीधर तांबे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
दरम्यान ओमिक्रॉनच्या (Omicron Variant) पार्वश्वभुमिवर देशात लसीकरणाचा जोर वाढला आहे. सुरुवातीच्या काळात अनेक लोकांमध्ये लसीविषयी गैरसमज होते, परंतु जनजागृतीमधून ते दूर करायला प्रशासनाला बऱ्यापैकी यश आले आहे. आता लसीकरणाचा टक्का वाढला आहे. कोरोना लसीकरणावरती आताही संशोधन सुरु आहे. अनेक राज्य सरकार बुस्टर डोसची केंद्राकडे मागणी करत आहेत. अजून लहान मुलांचे लसीकरण बाकी आहे. अशातच असा निष्कर्श समोर येण म्हणजे सर्वांसाठी दिलासादायक आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.