Mumbai Local Train Mega Block  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train: मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करताय? रविवारी 'या' मार्गावर असेल मेगाब्लॉक, वाचा वेळापत्रक...

Mumbai Mega Block News: रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मुंबई लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Satish Daud

Mumbai Local Train Mega Block

रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मुंबई लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान काही लोकल उशिराने धावणार असून अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या माटुंगा -ठाणे अप आणि डाउन जलद मार्गावर रविवारी सकाळी ११ .०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत ब्लॉक (Mumbai Local Train) असेल. ब्लॉकदरम्यान CSMT येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील लोकलसेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

ठाणे स्टेशननंतर पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्याचबरोबर ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. (Latest Marathi News)

दुसरीकडे हार्बर मार्गावरील कुर्ला -वाशी अप आणि डाउन मार्गावर देखील रविवारी सकाळी ११. १० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सुटणाऱ्या CSMTकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

त्याचबरोबर CSMT येथून वाशी/पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. प्रवाशांच्या सोईसाठी ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला, पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवल्या जातील. दुसरीकडे पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात शनिवारी रात्री मेगाब्लॉक असल्याने रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! कृणालचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

पैसे झाडालाच लागतात; व्हिडिओ पाहून तुम्हीही होय म्हणाल, नेमकं प्रकार काय? VIDEO

भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ उमेदवारांची नावे जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

SCROLL FOR NEXT