Mumbai Local Mega Block on Sunday  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Mega Block: मुंबई लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; वाचा संपूर्ण वेळापत्रक...

Local Train Mumbai: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी हा मेगब्लॉक घेतला जाणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

Satish Daud

Mumbai Local Mega Block on Sunday

मुंबई लोकल ट्रेनच्या तिन्ही मार्गावर रविवारी (१८ फेब्रुवारी) मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी हा मेगब्लॉक घेतला जाणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी मुंबईकरांना रेल्वेचं वेळापत्रक जाणून घेणं गरजेचं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मध्य रेल्वे मार्गावर असणार मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप -डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक (Mumbai Local Mega block) घेण्यात येईल. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद/नीम-जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील

कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद/अर्धजलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील. (Latest Marathi News)

हार्बर रेल्वे मार्गावर असणार मेगाब्लॉक

हार्बर रेल्वे मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप-डाऊन मार्गावर रविवारी सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून वाशी/बेलापूर/पनवेल/ वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

तसेच पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहिल.

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी असणार मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई रोड ते भाईंदर अप-डाऊन जलद मार्गावर दिवसा कोणताही मेगाब्लॉक नसेल. मात्र, शनिवारी-रविवारी रात्री १२ ते मध्य रात्री ३.३० वाजेपर्यत मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकदरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील लोकल सेवा बोरिवली ते विरार स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. काही लोकल सेवा रद्द राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli : डोंबिवलीत डॉक्टर-वकिलांच्या घरांची आधी 'रेकी', मग धाडसी घरफोडी; दरोडेखोरांचा थरार सीसीटीव्हीत कैद

Tooth Pain Relief: दात दुखतोय? हे घरगुती वापरा, काही मिनिटांत मिळेल आराम

महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्याला धमकी, २ कोटी दे नाहीतर...

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Rahul Gandhi: राहुल गांधींना घरात घुसून गोळ्या घालू, भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून धमकी; VIDEO ने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT