मुंबई/पुणे

मुंबईतील गणेश मंडळांसाठी महत्वाची बातमी; मंडप परवानगीची मुदत 'या' तारखेपर्यंत वाढवली

पालिकेने गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि मुंबईकर नागरिकांना उद्देशून एक परिपत्रक काढलं.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकने (BMC) मुंबईतील गणेश भक्तांच्या विनंतीचा मान राखत गणेश मंडळ मंडपाना परवानगी देण्याची मुदत वाढवली आहे. यासाठी पालिकेने गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि मुंबईकर नागरिकांना उद्देशून एक परिपत्रक काढलं असून त्याद्वारे ही मुदत वाढविल्याची माहिती मुंबईकरांना (Mumbai) दिली आहे.

बृहन्मुंबई क्षेत्रात गणेश मंडळ मंडपाना परवानगी देण्याची अंतिम मुदत मंगळवार दिनांक २३ ऑगस्ट २०२२ अशी निश्चित करण्यात आली होती. मात्र, विविध गणेश भक्त व मंडळांनी त्यास मुदतवाढ देण्याची विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे केली होती.

पाहा व्हिडीओ -

या विनंतीचा मान राखून, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने गणेशोत्सव मंडप परवानगी अर्ज सादर करण्याची मुदत शुक्रवार, दिनांक २६ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत वाढवली आहे, अशी माहिती उपायुक्त (परिमंडळ- २) तथा सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक श्री. हर्षद काळे यांनी दिली आहे. त्यामुळे आता ज्या मंडळांनी मंडप परवानगी काढली नव्हती त्यांना उद्यापर्यंत परवानगी काढता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT