Rain News in Maharashtra Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्वाचे; मुंबई पुण्यासह 'या' भागात कोसळणार तुफान पाऊस

Weather Update in Maharashtra : येत्या २४ तासांत मान्सून मुंबईत दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून पुढील ४ दिवस राज्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Satish Daud

कोकणासह मध्य महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे. त्यामुळे सध्या या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या २४ तासांत मान्सून मुंबईत दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून पुढील ४ दिवस राज्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

आयएमडीच्या माहितीनुसार, आजपासून (९ जून) मान्सूनचा प्रवास झपाट्याने होणार आहे. त्यामुळे राज्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी दक्षिण कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाडा-विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातही मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर उद्या म्हणजेच सोमवारी कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वीची कामे लवकरात लवकर आटोपून घ्यावी.

मात्र, खरी हंगामाची पेरणी करताना घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. सध्या पुण्यात धुव्वाधार पाऊस सुरू असून मुंबईतही पावसाचं आगमन झालं आहे. येत्या काही तासांतच मुंबईसह उपनगर, पालघर, अहमदनगर, नाशिक, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहनही आयएमडीकडून करण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT