Mumbai Rain Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Rain: मुंबईत 'रेड अलर्ट', पावसामुळे नागरिकांची दाणादाण; लोकल सेवा विस्कळीत, ट्रेनची सद्यस्थिती काय? जाणून घ्या

Satish Kengar

गेल्या काही तासांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. काही तासांच्या पावसातच मुंबईतील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. यातच मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्याने मुंबईत उद्या दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८.३० पर्यंत अत्यंत जोरदार पावसाचा अंदाज (रेड अलर्ट) वर्तवला आहे. नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असंही बीएमसीने म्हटलं आहे.

मुसळधार पावसाचा मोठा फटका आता सामान्य नागरिकांना बसताना दिसत आहे. कारण काही तासांच्या पावसातच मुंबईत रेल्वे रुळावरही पाणी साचलं आहे. ज्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

लोकल ट्रेनची सद्यस्थिती काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. विद्याविहार ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन लोकल मार्गावर मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे.

भांडुप - नाहूर डाऊन लोकल मार्गावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. कांजूरमार्ग ते विक्रोळी दरम्यान अप आणि डाऊन लोकल मार्गावर 30 किमी प्रतितास वेगाने ट्रेन चालवण्याचे सूचना देण्यात आली आहे.

अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद

दरम्यान, मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील तासाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे अंधेरी सब वे सखल भाग असल्यामुळे पाण्याखाली गेला आहे असून सबवेत तीन ते चार फुटापर्यंत पाणी साचले आहे. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या सबवेत पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद झाल्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: कोल्हापुरात भाजपची ताकद वाढली, अमित शहा यांच्या उपस्थितीत बड्या नेत्याने केला BJP मध्ये प्रवेश

Marathi News Live Updates: नवी मुंबई परतीच्या पावसाचा धुमाकूळ,

Larvae in Cadbury: कॅडबरीत आढळल्या अळ्या! व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कंपनीने काय केला खुलासा, वाचा...

Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का? बडे नेते तुतारी फुंकणार? VIDEO

Weather Update: चक्रीवादळाचा कहर! मुंबईनंतर 'या' राज्यांमध्ये करणार विध्वंस, पाहा IMD चा नवी अपडेट

SCROLL FOR NEXT