Kalyan Rain update  Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Rain : कल्याण-डोंबिवलीत मुसळधार! खाडीलगतच्या रहिवाशांची चिंता वाढली, हवामान विभागाने काय इशारा दिला?

Kalyan Rain update : कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसाने स्थानिकांची चिंता वाढवली आहे.

Vishal Gangurde

कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पावसामुळे खाडीकिनारी पूरपरिस्थिती निर्माण

हवामान खात्याने पुढील दोन दिवस अजून मुसळधार पावसाचा इशारा

उल्हास, काळू आणि अन्य नद्यांच्या संगम

महापालिका आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस सुरु आहे. कल्याण-डोंबिवलीतील खाडी पात्राच्या लगतच्या भागातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यात हवामान विभागाने आणखी दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील खाडी पात्राच्या लगत राहणाऱ्या रहिवाशांची चिंता वाढली आहे.

कल्याण-डोंबिवलीत काल रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने खाडीलगतचा भाग जलमय झालाय. पावसाच्या तडाख्यामुळे कल्याण खाडी दुतर्फी वाहू लागली आहे. या खाडीतील पाण्याची पातळी धोक्याच्या टप्प्याजवळ पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहेत.

हवामान खात्याने अजून दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. गांधारी गणेशघाट पाण्याखाली गेला आहे. या पावसाचा जोर कायम राहिला तर खाडी शेजारील गावांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. कल्याण खाडीला काळू आणि उल्हास नद्या मिळून तीन नद्यांचा संगम झालाय.

कर्जत आणि कसारा भागातील मुसळधार पावसामुळे या नद्यांचे पाणी वेगाने कल्याण खाडीतून समुद्राच्या दिशेने सोडले जात आहे. यामुळे खाडीकिनारी राहणाऱ्या शेकडो घरांना पाण्याचा वेढा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कल्याण-डोंबिवलीतील परिस्थितीवर महापालिका आणि आपत्कालीन यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. नागरिकांना खाडी-किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

सोलापुरात आदिला नदीला पूर

सोलापूर शहरातील आदिला नदीला पूर आला आहे. शहरातील स्वराज्य विहार, वैष्णवी हाईट्स, वसंत विहार भाग या 3 भागांमध्ये पाणी शिरलं आहे. या पूराच्या पाण्याचा आणखी प्रवाह वाढला तर आणखी सोसायटीमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महापालिका यंत्रणेसह पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final : पॉवर प्लेमध्ये दुबे, बुमराहकडून गोलंदाजी! फायनलसाठी खास 'प्लान', भारताचा प्रयोग यशस्वी होणार?

Maharashtra Live News Update: नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी 2 हजार 200 कोटींचा पहिला हप्ता मंजूर

Maharashtra Weather: अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर

Monday Horoscope : महत्त्वाची जबाबदारी खांद्यावर पडणार, धनलाभ होणार; ५ राशींच्या लोकांना कमाईचा नवा मार्ग मिळणार

IND Vs PAK : टीम इंडियात मोठे बदल! हार्दिक, अर्शदीप बाहेर; कोणाला मिळाली संधी? पाहा Playing XI

SCROLL FOR NEXT