Maharashtra Today Weather News Saam Tv
मुंबई/पुणे

Rain Alert : हवामानाचा मूड बदलला, पुण्यात पावसाची शक्यता; आज तुमच्या शहरातील तापमान कसं असेल?

Maharashtra Today Weather News : राज्यात किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली असून मुंबईसह अनेक भागात उष्णतेची लाट जाणवत आहे. पुणे विभागात १७-१८ फेब्रुवारीदरम्यान हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात किमान तापमानात वाढ; थंडीचा प्रभाव कमी

  • मुंबई व कोकणात उष्ण व दमट हवामान

  • पुणे विभागात १७-१८ फेब्रुवारीदरम्यान हलक्या पावसाची शक्यता

  • हवामानातील बदलामुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता

राज्यात किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब होऊन उकाडा वाढला आहे. मुंबईसह अनेक भागात उष्णतेची लाट आल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे पुण्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान सततच्या हवामान बदलामुळे नागरिकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावं लागत आहे.

हवामान अंदाजानुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे जमिनीवर एक 'ट्रफ' (कमी दाबाचा पट्टा) तयार होत आहे. यामुळे १७ आणि १८ फेब्रुवारीच्या सुमारास महाराष्ट्रातील पुणे विभागासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात.

जरी हा पाऊस मोठा नसला, तरी फेब्रुवारीतील हा बदल पिकांसाठी आणि वाढत्या तापमानासाठी महत्त्वाचा ठरेल.काल म्हणजेच गुरुवारी धुळे, परभणी आणि जेऊर येथे राज्यातील नीचांकी ११.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उन्हाचा चटका वाढल्याने उकाड्यातही वाढ झाली आहे. आज (ता. १३) किमान तापमान स्थिर राहणार असून, कोकणात उष्ण व दमट हवामान, तर पुण्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: चेहरा फ्रेश दिसावा म्हणून रोज टॅल्कम पावडर लावता? मग, त्वचेवर होऊ शकतात हे ७ परिणाम

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर तीन कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

मोठी बातमी! मुंबई-पुण्यातील स्विमिंग पूल आणि बांधकामांवर निर्बंध येणार? मंत्री बावनकुळेंचे संकेत, नेमकं काय म्हणाले?

Chanakya Niti: लग्नानंतर रोज भांडणं होतायेत? ही ५ कारणं नक्की जाणून घ्या! काहीच दिवसांत जाणवेल बदल

ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टात याचिका; वगळलेली मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्याची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT