मोकाट कुत्र्यांना खायला घालाल तर दंड भराल; नवी मुंबईतील सोसायटीचा अजब फतवा ! SaamTV
मुंबई/पुणे

मोकाट कुत्र्यांना खायला घालाल तर दंड भराल; नवी मुंबईतील सोसायटीचा अजब फतवा !

कुत्रा भुंकला तर 5 हजार रुपये दंड, कुत्रा कुणावर धावून गेला तर 25 हजार रुपये दंड, कुत्रा चावल्यास 50 हजार रुपये दंड...

विकास मिरगणे

नवी मुंबई : नवी मुंबईतील (Navi Mumbai) पामबीच लगत असलेल्या एनआरआय या उच्चभ्रू सोसायटीने एक अजब फतवा काढला आहे. या सोसायटीतील मोकाट कुत्र्यांना (Dogs) जे खायला देतात त्यांना दंड आकारला जातो. जर तुम्ही तो दंड भरला नाही तर रहिवाशीयांवर कारवाई केली जाते. या अजब फतव्यामुळे अनेकजण चक्रावून गेले आहेत.

असा आहे फतवा -

कुत्रा भुंकला तर 5 हजार रुपये दंड !

कुत्रा कुणावर धावून गेला तर 25 हजार रुपये दंड !

कुत्रा चावल्यास 50 हजार रुपये दंड !

कुत्र्याने घाण केल्यास 10 हजार रुपये दंड ! अशी दंडाची तरतुद केली आहेच शिवाय वेळ पडल्यास गुन्हेही दाखल केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व प्रकरण धक्कादायक असून हा दंड फक्त आणि फक्त जे या सोसायटीतील मोकाट कुत्र्यांना अन्न देतील त्यांनाच आहे. एनआरआय सोसायटीने (NRI Society) या मोकाट कुत्र्यांची सोसायटी बाहेर दोन शेड करण्यात आल्या आहेत. मात्र सोसायटीतील सर्व कुत्रे या शेड मध्ये येत नसल्याने हा पेच निर्माण झाला आहे.

हे देखील पहा -

यामुळे श्वान प्रेमी (Dog lover) आणि सोसायटी मधील वाद दिल्ली पर्यंत पोहोचला आहे. या मुक्या जनावरांच्या जीवाशीच खेळणारा हा फतवा आहे. या फतव्याविरोधात वेळ पडल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावु अशी भूमिका या सोसायटी मधील रहिवाशी आणि भारतीय पशु कल्याण बोर्डच्या (Animal Welfare Board of India) सदस्या सिद्ध विद्या यांनी घेतली आहे.

तर एनआरआय सोसायटी मधील मोकाट कुत्र्यांना जेवू घालणाऱ्या नागरिकांना लाखो रुपयांचे दंड लागू करण्यात आलेत यामुळे नागरिक त्रस्त झालेत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT