Narayan Rane Saam TV
मुंबई/पुणे

'राणेंनी मोदी-शहांच नाव नाही घेतलं तर त्यांची नोकरी जाईल'

मोदी अमित शहा यांची नावे नारायण राणेंना (Narayan Rane) घेणं स्वाभाविक आहे.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : छत्रपतींचा अपमान पंतप्रधानांनी केला छत्रपतींच्या विरोधातली मानसिकता स्पष्ट दिसतेय राज्यपाल देखील अपमान करतात भाजपसाठी नरेंद्र मोदींच देव आहेत असं वर्तन भाजपचे आहे. राजमुद्रा आणि छत्रपतींचा अपमान करण्याचा कांन्ट्रॅक्ट भाजपनं घेतलाय का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उपस्थित केला आहे.

तसंच 'नरेंद्र मोदी गो बॅकचे' नारे पुण्यात बघायला मिळत आहेत. देशभरात मोदींचा विरोध होतोय पुण्याच्या जनतेची मोदी गैरसोय करतायत पुणेकर देखील भाजपवर नाराज दिसतायत अशी टीकाही त्यांनी आजच्या मोदींच्या (Narendra Modi) पुणे दौऱ्यावरुन केली आहे.

दरम्यान, दोन दोन तीन तीन दिवस ED आणि CBI तपास करत आहे आणि काहीच हाती येत नाही आहे. हा तपासाचा भाग आहे त्यामुळे आम्ही देखील यासंदर्भात बोलत नाही. मोदी अमित शहा यांची नावे नारायण राणेंना (Narayan Rane) घेणे स्वाभाविक ते त्यांचा आता दैवत आहेत नाव नाही घेतलं तर राणेंची नोकरी जाईल असा खोचक टोलाही त्यांनी राणेंना लगावला आहे. तसंच 20 हजार विद्यार्थी युक्रेन मध्ये होते प्रचारक पंतप्रधान निवडणूक मध्ये व्यस्त होते त्यामुळे विद्यार्थी चे हाल झाले असल्याचही पटोले म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT