सचिन गाड, मुंबई
आयसीआयसी बँक आणि व्हिडिओकॉन कर्ज घोटाळा प्रकरणात चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. हायकोर्टाने जानेवारी २०२३ मध्ये दिलेला अंतरिम जामीन नियमित केला आहे. चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर त्यांची अटक बेकायदा ठरवत त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. (Latest Marathi News)
न्यायमूर्ती अनूजा प्रभूदेसाई आणि एनआर बोरकर यांच्या खंडपीठाने चंदा कोचर आणि दीपक कोचर यांच्या अंतरिम जामीन नियमित केला. कोचर यांचे वकील अमित देसाई यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, सहकार्य न करण्याचा आधारावर अटक करणे चुकीचे होते. चंदा कोचर यांना सीबीआयने अटक केली. त्यावेळी एकही महिला सीबीआय अधिकारी उपस्थित नव्हती. कायद्यानुसार अटक करताना एक महिला अधिकारी असणे गरजेचे होते, असा युक्तिवाद देसाई यांनी केला. . ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मिळालेल्या माहितीनुसार, २०१२ साली व्हिडिओकॉन ग्रुपला आयसीआयसी बँकेकडून कर्ज देण्यात आलं होतं. या कर्जाला नंतर 'एनपीए' घोषित करण्यात आलं आहे. त्यानंतर बँक घोटाळा उघडकीस आला. सप्टेंबर २०२० साली ईडीकडून दीपक कोचर यांना अटक करण्यात आली होती.
चंदा कोचर यांच्या नेतृत्वात आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन ग्रुपला ३,२५० कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. सहा महिन्यानंतर पुन्हा व्हिडिओकॉनचे तत्कालिन अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना ६४ हजार कोटींचं कर्ज दिलं होतं. या कर्जात दीपक कोचर यांची ५० टक्क्यांची भागीदारी होती.
तत्पूर्वी, आयसीआयसीआयचे बँक आणि व्हिडिओकॉनचे शेअर हॉल्डर अरविंद गुप्ता यांनी आरोप करत रिझर्व्ह बँक आणि सेबीला पत्र लिहून वेणुगोपाल धूत आणि चंदा कोचर यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले होते. व्हिडिओकॉन कंपनीला आयसीआयसीआय बँकेने ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आलं. या कर्जाच्या बदल्यात धूत यांनी दीपक कोचर यांच्या उर्जा कंपनीत पैशांची गुंतवणूक केली, असा आरोप पत्रात करण्यात आला.
चंदा कोचर यांनी पतीच्या कंपनीसाठी वेणुगोपाल धूत यांना मदत केल्याचा आरोप आहे. २०१८ साली हे प्रकरण उघडकीस आलं आहे. त्यानंतर चंदा कोचर यांना बँकेचा राजीनामा द्यावा लागला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.