IAS officer Transfer Saam Tv
मुंबई/पुणे

Tukaram Mundhe Transfer : IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, मागील ४ महिन्यांतील तिसरी बदली, आता कोणती जबाबदारी मिळाली?

IAS Transfer : तुकाराम मुंढे सध्या मंत्रालयातील मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : डशिंग IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. मागील ४ महिन्यांत त्यांची ही तिसरी बदली आहे. तर १६ वर्षांच्या कारकिर्दीतील ही २१ वी बदली आहे.

तुकाराम मुंढे सध्या मंत्रालयातील मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. २ जून रोजीच त्यांची याठिकाणी वर्णी लागली होती. मात्र त्यांची नियुक्ती आता कृषी विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे.  (Latest Marathi News)

तुकाराम मुंढे आत्तापर्यंतची कारकीर्द

  • ऑगस्ट २००५ - प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर.

  • सप्टेंबर २००७ - उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग.

  • जानेवारी २००८ - सीईओ, जिल्हा परिषद नागपूर.

  • मार्च २००९ - आयुक्त, आदिवासी विभाग.

  • जुलै २००९ - सीईओ, वाशिम.

  • जून २०१० - सीईओ, कल्याण.

  • जून २०११ - जिल्हाधिकारी, जालना.

  • सप्टेंबर २०१२ - विक्रीकर सहआयुक्त मुंबई.

  • नोव्हेंबर २०१४ - सोलापूर जिल्हाधिकारी.

  • मे २०१६ - आयुक्त, नवी मुंबई महापालिका.

  • मार्च २०१७ - मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे.

  • फेब्रुवारी २०१८ - आयुक्त, नाशिक महापालिका.

  • नोव्हेंबर २०१८ - सहसचिव, नियोजन.

  • डिसेंबर २०१८ - प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई.

  • जानेवारी २०२० - आयुक्त, नागपूर महापालिका.

  • ऑगस्ट २०२० - सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.

  • जानेवारी २०२१ - राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत.

  • सप्टेंबर २०२२ - आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान.

  • २९ नोव्हेंबर २०२२ - नियुक्तीच्या प्रतीक्षेत

  • एप्रिल २०२३ - सचिव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

  • २ जून २०२३ - सचिव मराठी भाषा विभाग

दीड महिन्यांनंतर नाशिक मनपाला आयुक्त मिळाले

नाशिक महानगरपालिकेला दीड महिन्यानंतर आयुक्त मिळाले आहेत. डॉ. ए. एन. करंजकर नाशिकचे नवे मनपा आयुक्त असतील. मनपा आयुक्त यांच्याबरोबर नव्या जिल्हाधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. जलज शर्मा नाशिकचे नवे जिल्हाधिकारी असतील. करंजकर हे आधी ईएसआयसी विभागात होते. तर जलज शर्मा धुळ्याचे जिल्हाधिकारी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजितदादांच्या पक्षात उलथापालथ होण्याची शक्यता, राज्यातील बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

DA Hike 2026 : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News! DA थेट १८% वर; जुलैपासूनची थकबाकीही मिळणार

Amitabh Bachchan: मुंबईत खळबळ! बिग बी अमिताभ बच्चन यांचा 'जलसा' बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी

Maharashtra News Live Update: ऐन दिवाळीत बोगस बियाणे पीडित शेतकरी आक्रमक

NCP Merger: मोठी बातमी! 'अजितदादा असते तर राष्ट्रवादीचे विलिनीकरण झालं असतं', सुनील तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT