IAS Pooja Khedkar Mother Video Saam TV
मुंबई/पुणे

IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्या आईचा नवा कारनामा; थेट पोलिसांसोबतच घातली हुज्जत, पाहा VIDEO

IAS Pooja Khedkar Mother Video : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईचा आणखी एक कारनामा समोर झाला आहे. मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Satish Daud

सचिन जाधव, साम टीव्ही पुणे

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईचा आणखी एक कारनामा समोर झाला आहे. मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत खेडकर मेट्रो अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालताना दिसून येत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्या पोलिसांना देखील जुमानत नसल्याचं व्हिडीओतून दिसतंय.

२०२२ मधील ही घटना असून पोलिस दलातील (Pune Police) एका कर्मचाऱ्याने पुरावा म्हणून ती रेकॉर्ड केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खेडकर कुटुंबाचा पुण्यातील बाणेर रस्त्यावर ओम दीप नावाचा बंगला आहे. या बंगल्याच्या समोर गेल्या काही वर्षांपासून मेट्रोच काम सुरू आहे.

या कामासाठी असलेले साहित्य मेट्रो कर्मचाऱ्यांनी खेडकर यांच्या बंगल्या हमोरील फुटपाथवर ठेवले होते. त्यावरून मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांनी मेट्रो कर्मचाऱ्यां सोबत वाद सुरू केला. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती चतुःश्रृंगी पोलिसांना दिल्यानंतर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील कर्मचारी तिथे पोहचले.

मात्र, मनोरमा खेडकर यांनी त्यांच्याशी देखील वाद घातला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ एका पोलीस कर्मचाऱ्याने रेकॉर्ड म्हणून शूट केला होता. दरम्यान, या व्हिडीओमुळे मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत आणखीच वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या मनोरमा खेडकर आणि त्यांचे पती फरार असून पोलिसांकडून दोघांचाही शोध सुरू आहे.

पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांवर गुन्हा

जमिनीच्या वादातून पुण्यातील मुळशी येथील शेतकऱ्याला बंदूक हातात घेऊन धमकावल्याप्रकरणी पोलिसांनी पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धडवली गावात खेडकर कुटुंबाने तब्बल २५ एकर जमीन खरेदी केली होती, ती ताब्यात घेताना शेजाऱ्यांचीही जमीन ताब्यात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याला जेव्हा शेतकऱ्यांनी विरोध केला तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना बंदूक हातात घेऊन धमकावलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

...तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Suraj Chavan Dance: बिग बॉस फेम सूरजचा नाद नाय! 'तांबडी चामडी' गाण्यावर केला डान्स; Video व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

8th Pay Commission: केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ व्या वेतन आयोगात किमान वेतन १८,००० नव्हे ३४५०० होणार

SCROLL FOR NEXT