Pune IAS Officer Pooja Khedkar Posting  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: IAS अधिकारी पूजा खेडकर यांची 'ऑडी' अखेर जप्त, आई मनोरमा खेडकर यांच्याही अडचणी वाढणार

Pooja Khedkar Controversy Latest Update: पूजा खेडकर प्रकरणातील ऑडी कार अखेर पुणे पोलिसांनी जप्त केली आहे. पूजा खेडकर यांच्या बंगल्यावरून काल रात्री ऑडी वाहतूक पोलिसांनी ही कार जप्त केली.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे|ता. १४ जुलै २०२४

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकर प्रकरणातील ऑडी कार अखेर पुणे पोलिसांनी जप्त केली आहे. पूजा खेडकर यांच्या बंगल्यावरून काल रात्री ऑडी वाहतूक पोलिसांनी ही कार जप्त केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. खासगी ऑडी कारवर महाराष्ट्र शासन लिहल्यामुळे तसेच लाल दिवा लावल्याने पूजा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी ही ऑडी कार खेडकर यांच्या बंगल्यातून जप्त केली आहे.

पूजा खेडकर यांनी याच ऑडी कारला दिव्यासह महाराष्ट्र शासन बोर्ड लावला होता. याप्रकरणी कारसह कारचे कागदपत्रे तपासणीस हजर राहण्यासाठी पुणे पोलिसांनी नोटीस बजावली होती. तसेच हजर न राहिल्यास पुणे पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पूजा खेडकर यांनी या ऑडी कारचा 2 दिवसांपूर्वी 27600 रुपयांचा दंडही भरला होता.

दरम्यान, पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.मनोरमा खेडकर यांनी जमीनीच्या वादातून मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून धमकावले असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामुळे त्या पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत. मात्र मनोरमा खेडकर यांच्याकडून पुणे ग्रामीण पोलिसांचे फोन उचलण्यासाठी टाळाटाळ केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुणे पोलीस आज मनोरमा खेडकर यांच्या घरी चौकशीसाठी जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mantralaya Bribe Case: एक लाईन म्हणजे 50 हजार, दोन लाईन म्हणजे...; मंत्रालयातील लाचखोरीचं रेट कार्ड व्हायरल

Maharashtra Live News Update : . कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अनोखी कलाकृती साकार

Dhule Crime : लग्नसोहळ्यात रक्तरंजित थरार! ८ जणांवर चाकूने सपासप वार, तिघांचा जागीच मृत्यू

Raja Shivaji: हातात भगवा, नजरेत ज्वाला…; शिवजयंतीनिमित्त रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाची दमदार झलक समोर

Kolhapur News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अश्लील डान्स|Video Viral

SCROLL FOR NEXT