IAS Pooja Khedkar Saam Tv
मुंबई/पुणे

Trainee IAS Pooja Khedkar : 11 वेळा UPSCची परीक्षा, नावात बदल; पूजा खेडकर यांचे आणखी कारनामे आले समोर, VIDEO

Pooja Khedkar : प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे दररोज नवनवे कारनामे पुढे येत आहेत. अंबर दिवा आणि केबिनसाठी अरेरावी करणा-या पूजा खेडकरांनी तब्बल 11 वेळा यूपीएससी परीक्षा दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासाठी त्यांनी नावंही बदलल्याचा पर्दाफाश झालाय. पूजा खेडकरांनी IAS अधिकारी होण्यासाठी काय काय प्रताप केले त्यावरचा हा रिपोर्ट....

Tanmay Tillu

मुंबई : IAS पूजा खेडकरची चर्चा तिच्या कामगिरीमुळे नव्हे तर तिनं आणि तिच्या कुटुंबानं केलेल्या कारनाम्यांमुळे होतेय....पूजाच्या प्रकरणात रोज नवेनवे खुलासे होतायत. MBBSचं शिक्षण घेतलेली पूजा दिलीप खेडकर 2023 बॅचची IAS अधिकारी आहे. तिच्या निवडीवरच प्रश्न निर्माण झालंय. अंबर दिवा, केबिनपर्यंत पूजाचे कारनामे संपले नाहीत...तर तिथून सुरू झालेले कारनामे थेट तिनं 11 वेळा दिलेल्या यूपीएससीपर्यंत पोहचले आहेत.

पूजा खेडकर यांचे 5 प्रताप

दिव्यांगाचं प्रमाणपत्र -

पहिल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ‘दृष्टीदोष’, दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात डोळ्याची समस्या,अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्याचाही प्रयत्न

नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र

22 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण असूनही नॉन क्रिमीलेयर कोट्यातून अर्ज

वाहनाला अंबर दिवा -

प्रशिक्षणार्थी असूनही वैयक्तिक ऑडी कारला अंबर दिवा लावला

वरिष्ठांच्या कॅबिनवर कब्जा

अतिरिक्त जिल्हाधिका-यांच्या अँटी चेंबरमधील सर्व सामान काढून त्या ठिकाणी स्वत:च्या नावाचा बोर्ड

11 वेळा UPSCची परीक्षा -

UPSC परीक्षा देण्याचे प्रयत्न संपल्यानंतरही नाव बदलून तब्बल 11 वेळा परीक्षा

19-20पर्यंत खेडकर पूजा दिलीपराव नावाचा वापर

21-22ला पूजा मनोरमा दिलीप खेडकर नावाचा वापर

पुण्यात प्रशिक्षणार्थी असताना पूजा खेडकरनं अनेक सुविधांची मागणी केली. खरं तर या सुविधा प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना मिळत नाहीत. या सर्व प्रकरणानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून पूजा खेडकरची तक्रार केली. त्यानंतर पूजाची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली.

पूजा खेडकर प्रशिणार्थी IAS अधिकारी आहेत. IAS अधिकारी होण्यासाठी UPSCसारखी खडतर परीक्षा द्यावी लागते. मात्र अत्यंत संवेदनशील अशा UPSC बाबत असे प्रकार घडत असतील तर देशाचा कारभार भगवान भरोसेच आहे असंच म्हणता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT